Saturday, March 2

Crop Loan :अजित पवारांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळणार!

Last Updated on December 23, 2023 by Jyoti Shinde

Crop Loan

नाशिक : पीक कर्ज वेळेवर मिळणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण या कर्जाच्या मदतीने शेतकरी त्यांची सर्व शेतीची कामे वेळेत पूर्ण करू शकतात आणि उत्पादन वाढीवर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. मात्र अनेकदा शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांकडे जावे लागते.

परंतु वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतीची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा सावकाराच्या दारात जावे लागते. कर्जाच्या बाबतीत शेतकर्‍यांचे आर्थिक दृष्टिकोनातून जिल्हा बँकांशी खूप घट्ट नाते आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जिल्हा बँकेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार(Ajit pawar) यांनी २६ जुलै रोजी बैठक घेऊन बुलढाणा जिल्हा बँकेच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिल्याने आता शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Crop Loan

स्टेट बँकेला काय सूचना दिल्या?

लगेच,या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, आर्थिक संकटात सापडलेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ५० लाखांचे सॉफ्ट लोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच राज्य बँकेला शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहे. बँकेने आता 300 कोटींचे कर्ज मंजूर केले असल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बँकेला तीनशे कोटींचे कर्ज मंजूर झाल्याने जिल्ह्यातील लाखो शेतकरी व ग्रामस्थांना कर्ज वाटप करणे बँकेला सोपे होणार असून, आता या निर्णयाचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.Crop Loan

हेही वाचा: RBI Fact Check : RBIची २ बँकांवर कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश,ठेवीदारांच्या पैशांच आता काय होणार? यात तुमची तर बँक नाही ना पहा.

Comments are closed.