Last Updated on March 11, 2023 by Jyoti S.
crop loan : डॉ.पंजाबराव देशमुख यांची व्याज सवलत योजना
थोडंस पण महत्वाचं
शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज( crop loan) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.कोरोना विषाणू रोखण्यासाठी नियमांनुसार ग्रामसभा स्तरावर जनजागृती करून या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. महसूल व ग्रामविकास(Dr.Punjabrao Deshmukh) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक शाखा अधिकार्यांना शेतकर्यांना आर्थिक मदतीसंदर्भातील अडचणी सोडविण्याचे तसेच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गतवर्षीच्या तुलनेत वाढवून ३० जूनपर्यंत शेतकर्यांना पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या.
आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.
तालुक्यातील खरीप पीक कर्जाबाबत सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पीक कर्जाबाबत(crop loan) अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे, सहायक दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांच्यासह तालुक्यातील विविध बँकांचे शाखाधिकारी (पीक कर्ज) उपस्थित होते.
येथे पहा तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळणार?
पात्रता,अटी-शर्ती
इथे क्लिक करून पहा
सत्तार म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे( crop loan) नुकसान झाले आहे. यासोबतच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदीसाठी वेळेवर पैसे मिळावेत. शेतकरी सावकारांच्या तावडीत येऊ नये म्हणून शासन विविध योजना करत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. बँकांनी पीक कर्जाच्या मागणीसाठी ऑनलाइन ऐवजी ऑफलाइनचा पर्याय निवडावा.
हेही वाचा:mahadbt solar pump : सौर पंप ऑनलाइन अर्ज करा | सौर पंप योजना
बँकांनी पीक कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध योजनांची माहिती गावोगावी ग्रामसभांद्वारे द्यावी आणि शेतकऱ्यांना शासनाकडून तीन लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, राज्य सरकारने तीन लाख रुपयांपर्यंतची हमी दिली आहे. यावर सरकार व्याज देणार आहे, त्यामुळे बँकांनी काळजी करू नये, शेतकऱ्यांनी यापुढे तक्रार करू नये, अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी दिल्या आहेत.