Tuesday, February 27

Indian Railways Rules : ट्रेनने प्रवास करणाऱ्यांनो सावधान! तुम्ही रेल्वेचा हा नियम पाळला नाही तर तुम्हाला 1 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल

Last Updated on May 2, 2023 by Jyoti S.

Indian Railways Rules: दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात . रेल्वेला भारताची दळणवळण लाइफलाइन देखील म्हटले जाते. मात्र रेल्वे बोर्डाने ट्रेन आणि प्रवाशांबाबत काही नियम जारी केले आहेत.या प्रवाशांना त्या नियमांचे चांगल्या पत्थतीने काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

रेल्वे विभागाने जारी केलेल्या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला रेल्वे विभागाचे नियम माहित असणे आवश्यक आहे.

रेल्वेच्या प्रत्येक डब्यात अलार्म चेन बसवण्यात आली आहे. ही साखळी आपत्कालीन परिस्थितीसाठी बसवली जाते. आपत्कालीन परिस्थितीत ही साखळी ओढण्याची परवानगी आहे.
मात्र अनेकदा या अलार्म साखळीचा गैरवापर होतो. त्यामुळे हा गैरवापर रोखण्यासाठी रेल्वे विभागाकडून नियमावली करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीतही कोणी साखळी खेचल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.

रेल्वे कायद्याच्या कलम 141 अन्वये मोठी कारवाई करण्यात आली आहे

तसेच याबाबत सोनपूर आणि धनबाद विभागातून 21-21 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

अनावश्यक चेन पुलिंगमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून गाड्यांनाही विलंब होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे यासंदर्भात रेल्वे विभागाने अनिवार्य नियम केले आहेत.

हेही वाचा: LPG Gas Cylinder New Rules : दिलासादायक!! एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा 171 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवीन दर

साखळी ओढल्यास एक वर्षाची शिक्षा होऊ शकते

रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार, जर एखाद्या प्रवाशाने कोणत्याही वैध कारणाशिवाय साखळी ओढली तर त्याला 1000 रुपये दंड किंवा 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, या गुन्ह्यासाठी आता गुन्हेगाराला( Indian Railways Rules) दंड तसेच 1 वर्षाचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो.

Comments are closed.