Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.
krushi Rice: ऑनलाइन थेट खात्यात जमा होणार
krushi Rice: पूर्व विदर्भासह राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे. दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे एकूण ३० हजार रुपयांचा हा बोनस डीबीटी अंतर्गत ऑनलाइन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचा लाभ पाच लाखांवर शेतकऱ्यांना होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून(krushi Rice) एक सर्वकष असा कृती आराखडा तयार होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांच्या शेती पंपांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी २०२० पर्यंत ३० टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्यासाठी एक आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली जाणार आहे. त्यात विविध मान्यवर तज्ज्ञांचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले. हेही वाचा: Lpg gas : एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळवण्यासाठी हे काम करा
दरम्यान, राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह तीनही विकास मंडळांची केंद्राच्या मान्यतेनंतर पुनर्गठन होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सूरजगडमध्ये १४ हजार व ५ हजार कोटींचे नवे प्रकल्प येणार असून त्यातून १० हजार नवे रोजगार निर्माण होतील, याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.