Last Updated on January 1, 2023 by Jyoti S.
Letter scheme : मोफत पत्र्याचा स्टॉल घ्या अन् व्यवसाय करा!
नाशिक(Letter scheme): धामाच्या वस्तू व पाटवाणे दुरुस्तीच्या क्षेत्रात अनुसूचित जाती संवर्गातील व्यक्ती मोठ्या संख्येने आहेत. त्यांची उपा व्यवसायावर चालते.
असे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला बसून आपला व्यवसाय करीत असतात. त्यांच्या व्यवसायाला संरक्षण मिळावे याबरोबरच त्यांची आर्थिक, सामाजिक उन्नती व्हावी यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, छावणी तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात शंभर टक्के शासकीय अनुदानावर मोफत पत्र्याचा स्टॉल दिला जातो.
काय आहे गटई स्टॉल योजना स्टॉल?
रस्त्यालगत बसून चामड्याची पादत्राणे बनविणे आणि दुरुस्ती करणाऱ्या घटकातील कारागिरांना संरक्षण मिळावे यासाठी त्यांना एक पत्र्याचा स्टॉल उपलब्ध करून दिला जातो.
काय आहे गटई स्टॉल योजना स्टॉल?
कोणाला मिळणार स्टॉल?
ज्या जागेवर स्टॉल्स मागणी(Letter scheme) करण्यात आलेली आहे. ती जागा शासनाची असली तरी खरेदीने, अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असेल किया जागा स्वमालकीची असेल तर लाभ मिळतो.
योजनेचे निकष काय
योजनेचे निकष काय? अर्जदाराचे वय हे १८ वर्षापेक्षा कमी नसावी, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात ४० व शहरी भागात ५० हजारपेक्षा अधिक नसावे.
अर्ज कोठे करणार
पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करणायाला जिल्ह्याच्या सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज करायचा आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर तसेच वेगवेगळ्या पद्धतीने संबंधित कार्यालयातही उपलब्ध आहे.
५ जानेवारीपर्यंत करा अर्ज
या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. येत्या ५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत असून संबंधितांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावे.
कागदपत्रे काय लागतात?
लाभासाठी आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी कागदपत्रे आवश्यक आहे. समाजकल्याण विभागाकडे अर्ज जमा करावी लागतो. स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्टॉलसाठी मागणी केली तर त्यांचा ठराव महत्त्वाचा असतो.
रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना शंभर टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल पुरवले जातात व ५०० रुपये रोख अनुदान देण्यात येते. चर्मकार बांधवांना त्यांच्या हक्काचे स्थान मिळण्यास मदत होते.
चर्मकार बांधवांना गटई स्टॉल सोबत अधिकृत परवानासुद्धा दिला जातो..