Last Updated on May 21, 2023 by Jyoti S.
List of PM Gharkul Yojana 2022 Maharashtra : तुमचे नाव तपासा.
Table of Contents
महाराष्ट्र घरकुल 2023(List of PM Gharkul Yojana) : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी बातमी येत आहे. ही बातमी घरकुल योजनेशी संबंधित आहे. राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना योग्य निवारा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आल्या आहेत हे आपणास माहिती आहे.
घरकुल योजनेमध्ये आपले नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना निवारा देण्यासाठी राज्य
सरकारने 60 कोटी रुपयांची रक्कम संबंधित जिल्ह्यांना वितरित केली आहे. आता कोणत्या विभागाला किती निधी मिळाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या विभागाला किती रक्कम
मुंबई विभागाला राज्य सरकारकडून ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
पुणे विभागाला रमाई आवास योजनेसाठी २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
नाशिक विभागाला 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
लातूर विभागाला २३ कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.
अमरावती विभागाला 42 लाख 50 हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.
रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना निवारा देण्यासाठी नागपूर विभागाला 12 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत 60 कोटी रुपयांचा निधी संबंधित यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
रमाई आवास योजनेंतर्गत संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याने या योजनेमुळे राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांना हक्काची घरे मिळण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा: Build a farm : पहा सरकारचा निर्णय.!! शेत बांध कोरले तर मोठा फटका? काय म्हणतो कायदा.!!
Comments 1