Last Updated on April 9, 2023 by Jyoti S.
Maha DBT Gov Subsidy
थोडं पण महत्वाचं
Maha DBT Gov Subsidy: आपले सरकार महाडीबीटी’ dbt Gov Subsidy हा महाराष्ट्र सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याद्वारे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील उत्तम उत्पादनासाठी कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी डीबीटी सरकारी अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवर फक्त एक अर्ज सबमिट करून सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेता येईल.
शेतकरी DBT सरकारी(Maha DBT Gov Subsidy) राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनांसाठी राज्य सरकारच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अधिक तपशिलांसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत त्यांच्या तालुक्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय किंवा कृषी डीबीटी गाव सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार योजना आणि सबसिडी
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – या योजनेअंतर्गत ठिबक संच, तुषार संच 45 टक्के आणि 55 टक्के अनुदान दराने प्रदान केले जातात.
▪️ कृषी यांत्रिकीकरण उप मोहिमेंतर्गत ट्रॅक्टर व इतर उपकरणे व यंत्रांच्या खरेदीवर 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.
▪️ राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत, ट्रॅक्टर आणि इतर उपकरणे आणि यंत्रांच्या खरेदीवर 40 टक्के ते 60 टक्के अनुदान देखील दिले जाते.
▪️ राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यांत्रिकीकरण, विहिरी, कांदा लागवड, संरक्षित शेतीसाठी 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.
▪️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या (डाळी, कडधान्ये, कापूस) या योजनेअंतर्गत बियाणे, यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीवर ५० टक्के अनुदान दिले जाते.
▪️ मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन प्रणालीच्या खरेदीवर २५ टक्के आणि ३० टक्के अनुदान दिले जाते.
▪️ एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदाचाळ, पॅक हाऊसस, पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, फार्म लाइनिंगच्या कामांवर 50 टक्के अनुदान दिले जाते.
▪️ भाऊसाहेब फुंडकर बाग लागवड योजनेंतर्गत संत्रा, आंबा, डाळिंब, शोभेच्या फुलांवर 100 टक्के अनुदान दिले जाते.