Last Updated on February 22, 2023 by Jyoti S.
Maha DBT Tractor Anudan yojna
थोडं पण महत्वाचं
Maha DBT Tractor Anudan yojna : कृषी विभागात प्रथमच महा डीबीटी ट्रॅक्टर अनुदान, यांत्रिकीकरणासाठी 600 कोटींचे अनुदान. मजुरांचा तुटवडा, वाढलेली मजुरी आणि पर्यायाने वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे ढकलले आहे. यात कृषी विभागानेही हातभार लावला असून, यावर्षी आतापर्यंतचे सर्वाधिक ६०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. त्यात आणखी 100 कोटींची वाढ अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 11 हजार ट्रॅक्टर देण्यात आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या तीन हजारांनी वाढली आहे.
यांत्रिकीकरणासाठी कृषी विभागाकडून(Maha DBT Tractor Anudan yojna) अकरा योजनांद्वारे अनुदान दिले जाते. यापैकी 3 योजना निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत, 1 योजना उद्यान विभागामार्फत, तर 7 योजना विस्तार विभागामार्फत राबविण्यात येतात. कृषी निविष्ठा आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने आतापर्यंत 3 योजनांसाठी 180, 171 आणि 142-142 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
इतर योजनांमधून एकूण 560 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यावर्षी सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी विविध अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अर्ज केले. सुमारे अकरा लाख पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महा डीबीटी ट्रॅक्टर अनुदान अनुदान अभियानातून 323 कोटी, राज्य सरकारकडून 400 कोटी आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 150 कोटी कृषी विभागाला देण्यात आले आहेत.
इथे क्लिक करून सविस्तर माहिती वाचा
याआधी २०१४ त राज्यात यांत्रिकीकरणासाठी फक्त २४ कोटींचं देण्यात आलेले होते मात्र आता 2016-17 मध्ये 60 कोटी अनुदानाचे वाटप करण्यात आले. 2018-19 मध्ये 367 कोटी देण्यात आले.
यावर्षी दहा हजार ७३७ ट्रॅक्टरची खरेदी (Maha DBT Tractor Anudan yojna)
यावर्षी ट्रॅक्टर खरेदीसाठीच्या(Maha DBT Tractor Anudan yojna) अनुदानाच्या वाटपात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी अनुदानावर 6 हजार 756 ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी 3000 ट्रॅक्टरची वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या ट्रॅक्टरसाठी पात्रतेच्या आधारे एक ते दीड लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यानुसार या 10 हजार 737 ट्रॅक्टरसाठी 130 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
तर सर्वाधिक 307 कोटी रुपयांचे अनुदान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या मशिन आणि उपकरणांसाठी देण्यात आले आहे. मागील वर्षी ट्रॅक्टर व अवजारांसाठी १२६ कोटींचे अनुदान देण्यात आले होते.