Last Updated on May 4, 2023 by Taluka Post
Matrutva Vandana Yojana
सरकारी योजना(Matrutva Vandana Yojana) : नमस्कार मित्रांनो, आता सरकारने विवाहित महिलांसाठी मातृत्व वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार आता महिलांच्या बँक खात्यात 5000 रुपये जमा करणार आहे. या योजनेचा लाभ विवाहित महिला घेऊ शकतात. केंद्र सरकार गरोदर महिलांना मातृत्व वंदना योजनेंतर्गत आर्थिक मदत करणार आहे. महिलांना सरकार कशी आर्थिक मदत करणार आहे ते पाहूया.
गर्भवती महिलांच्या आरोग्याची योग्य काळजी न मिळाल्याने जन्माला येणारी बालके कुपोषित राहतात. मुले कुपोषित होऊ नयेत, निरोगी रहावे. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकार त्यांना आर्थिक मदत करत आहे. या आर्थिक मदतीतून महिला गोळ्यांचा खर्च करू शकतात. Matrutva Vandana Yojana
अर्ज कसा करावा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 रोजी मातृ वंदना योजना सुरू केली. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गर्भवती महिलेचे वय किमान १९ वर्षे असावे. केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये जमा करणार आहे. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.
या मातृत्व वंदना योजनेंतर्गत(Matrutva Vandana Yojana) महिलांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाईल. महिलांना पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये, तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि मुलाच्या जन्मानंतर 1000 रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम गर्भवती महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
सविस्तर व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हेसुद्धा वाचलात का?
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनेची माहिती सरकारच्या अधिकृत लिंकवर मिळेल. योजनेसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. सरकारी योजनेशी संबंधित सर्व माहिती या वेबसाइटवर पाहता येईल
Comments 1