Namo shetkari mahasanman nidhi yojna:जिल्ह्यात ३० हजार शेतकरी महासन्मानाला मुकणार

Last Updated on October 12, 2023 by Jyoti Shinde

Namo shetkari mahasanman nidhi yojna

मालेगाव तालुक्यातील ३६१५ शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण

सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील साडेचार लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी २ हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३० हजार ४८५ शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रियाच पूर्ण केलेली नसल्याने त्यांचा हप्ता गोठविला जाणार असून ते या महासन्मानपासून वंचित राहणार आहेत.

१० ऑक्टोबरपर्यंत केवायसी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, इगतपुरी, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला अशा पंधरा तालुक्यांतील ४ लाख ४० हजार ६३८ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ४ लाख १० हजार ५३ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहेत. तर अद्याप 30 हजार ४८५ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण न केलेली नाही. या शेतकऱ्यांचा निधीचा हप्ता गोठविण्यात येणार आहे.Namo shetkari mahasanman nidhi yojna

केंद्र सरकारकडून किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

■ आता केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमल- बजावणी केली आहे.

जिल्ह्यातील साडेचार लाभ शेतकयांच्या बैंक खात्यावर दिवाळीपूर्वी २ हजार रुपये दिले जाणार आहेत.

नमो शेतकरी १ महासन्मान निधी योजनेसाठी शासनाकडून पहिल्या हप्त्यापोटी राज्याला १७२० कोटी रुपये इतका निधी कृषी विभागाला प्राप्त झाला आहे.Namo shetkari mahasanman nidhi yojna

हेही वाचा: Postachi yojana: 396 रुपये भरा, 10 लाख रुपयांचा विमा घ्या; किती लोकांना फायदा झाला?

एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीतील पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. केवासी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना १५ वा हप्ता व दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

चार लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड

१५ तालुक्यांतील दिडोरी, कळवण, निफाड, सुरगाणा व येवला या पाच तालुक्यांतील शेतकयांनी १५ टक्के केवायसी पूर्ण केली आहे, तर नांदगाव आणि पेठ या तालुक्यांतील ११ टक्के केवायसी अपूर्ण आहे. १५ तालुक्यांनी आतापर्यंत ९५ टक्के केवायसी पूर्ण झाल्यामुळे ४ लाख ४० हजार ६३८ शेतकऱ्यांपैकी तब्बल ४ लाख १० हजार ५३ शेतकयांच्या बैंक खात्यावर १५ वा हप्ता व महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत.

सहा हजारांची पडली भर

किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ६ हजार रुपये अनुदान मिळते. यात आणखी ६ हजारांची भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. १० ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी निधीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे.

हेही वाचा: Annasaheb Patil Economic Development Corporation: उद्योगासाठी ५० लाखांपर्यंत कर्ज; शासन भरणार व्याज

किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात होता. आता नव्याने नमो महासन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी लवकरच निधी लाभार्थाच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे.Namo shetkari mahasanman nidhi yojna

image 1 Taluka Post | Marathi News