Last Updated on January 17, 2023 by Jyoti S.
Nashik Kusum Solar Pump : शेतकऱ्यांना वीज बिलाची चिंता करण्याची गरज नाही, कुसुम सौरपंप योजनेला मिळत आहे 90% अनुदान!
Table of Contents
Nashik Kusum Solar Pump : पिकांना पाणी देणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे काम आहे, अशा परिस्थितीत शेतकरी मोटारच्या साहाय्याने पाणी भरत आहेत, मात्र वीज बिघाडामुळे अनेक वेळा पाणी भरणे बंद होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार २०२१ पासून शेतकऱ्यांसाठी कुसुम सौरपंप योजना राबवत आहे. मात्र, अद्याप ही योजना अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे समोर आले आहे.
केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असून त्यापैकी एक म्हणजे कुसुम सौर पंप योजना. अनेक वेळा भारनियमन आणि सिंचनाची सोय नसल्यामुळे पिकांना सहज पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. परिणामी उत्पादन घटते.
शेतकऱ्यांसमोरील हे संकट दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार कुसुम योजना राबवत आहे. मात्र ही योजना अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे वास्तव आहे. वीजबिलांची थकबाकी आणि रात्रीच्या वेळी पाणी पुरविण्याची भीषण परीक्षा यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी कुसुम सौरपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेद्वारे खुल्या प्रवर्गाला ९० टक्के तर एससी-एसटीला ९५ टक्के अनुदान मिळते. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.