New Update on Education : आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी सुद्धा दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही?; शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले

Last Updated on May 27, 2023 by Jyoti Shinde

New Update on Education

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतरही दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरूच राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी सांगितले की, पुढील वर्षी देखील इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सध्याच्या पॅटर्ननुसार घेतल्या जातील.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या(New Update on Education) बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत, असा गैरसमज विविध स्तरांतून पसरवला जात आहे. गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची देशभर चर्चा होत चाललेली आहे. या धोरणातील तरतुदींनुसार इयत्ता 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जातील, शालेय शिक्षणात वेगवेगळ्या टप्प्यांवर परीक्षा होतील की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.

थोडं पण महत्वाचं

याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी-पालकच नव्हे, तर शिक्षक-मुख्याध्यापक, शाळा प्रशासनही संभ्रमात व गोंधळलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर इयत्ता 12वीचा निकाल जाहीर करताना गोसावी यांनी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांची(New Update on Education) माहिती दिली.

हेही वाचा: LPG Gas Cylinder New Rules : दिलासादायक!! एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा 171 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवीन दर

गोसावी म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात” दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा सत्र पद्धतीनेच घ्याव्यात, असे सुचवण्यात आले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल. त्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षा होणार आहेत. याशिवाय पाचवी आणि आठवीच्या परीक्षा घेण्याबाबत धोरणात चर्चा करण्यात आली आहे.

हेही वाचा: shaskiy valu vikri yojna : ६०० रुपये ब्रासप्रमाणे कुटुंबाला मिळणार १२ ब्रास वाळू; इथे करा नोंदणी, १५ दिवसांत मिळेल लगेच वाळू

त्याचमुळे आता पुढील वर्षी सुद्धा दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही गोसावी यांनी सांगितले.

Comments are closed.