
Last Updated on March 30, 2023 by Jyoti S.
PM Awas Yojana 2023
थोडं पण महत्वाचं
PM Awas Yojana 2023 : पक्के घर बांधण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण आता केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मातीची घरे असलेल्या गरीब नागरिकांना आर्थिक मदत देत आहे.
पंतप्रधान आवास योजना(PM Awas Yojana 2023): आजही देशात गरीब नागरिक आहेत ज्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नाही. त्यामुळेच केंद्र सरकार अशा नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2.5 लाख रुपयांची मदत देत आहे.
तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर आता तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण आता सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली यादी जाहीर केलेली आहे ते पहा . तसेच अर्जदाराच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा: LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी आनंदाची बातमी,1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम
प्रधानमंत्री आवास योजना
केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना(PM Awas Yojana 2023) सुरू केली होती . गरीब नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे आता पक्की घरे बांधण्याचे नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
जे लोक अजूनही झुग्गी किंवा मातीच्या घरात राहत आहेत त्यांना मदत करून त्यांना पक्की घरे बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता तुम्हाला सरकारकडून 2.5 लाख रुपये दिले जातात.