Saturday, March 2

SBI Customer Service : SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 जूनपासून बदलणार बँकेचे नियम

Last Updated on May 27, 2023 by Jyoti Shinde

SBI Customer Service

स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI Customer Service) : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या लाखो ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती. तुम्ही देशातील कोणत्याही सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर तुमच्यासाठी 30 जून महत्त्वाचा आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडे खाती असलेल्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही देशातील कोणत्याही सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर तुमच्यासाठी 30 जून महत्त्वाचा आहे. आता sbi बँक 30 जूनपासून बँक काही महत्त्वाचे नियम बदलणार आहे. याचा फटका देशातील करोडो ग्राहकांना बसणार आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.SBI Customer Service

हेही वाचा: Kharip kanda anudan 2023 : आनंदाची बातमी! कांदा अनुदानासंदर्भात सरकारने घेतले दोन पाऊल मागे,शेतकरी झाला समाधानी…

स्टेट बँक ऑफ इंडिया 30 जूनपासून बँक लॉकरच्या नियमात बदल करणार आहे. या संदर्भात बँकेने अधिसूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की इंटरनेटवरील लॉकर धारकांना 30 जून 2023 पर्यंत सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेकडून या संदर्भात सातत्याने अधिसूचना जारी करण्यात येत आहेत.SBI Customer Service

बँकेने आता ग्राहकांना आपल्या लॉकर करारावर लवकरात लवकर आपली स्वाक्षरी करण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे. आपल्या अधिकृत ट्विटमध्ये SBI ने म्हटले आहे, “प्रिय ग्राहक, कृपया सुधारित लॉकर कराराच्या सेटलमेंटसाठी तुमच्या शाखेला भेट द्या.” तुम्ही अद्ययावत करारावर आधीच स्वाक्षरी केली असल्यास, तुम्हाला आता पूरक करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: LPG Gas Cylinder New Rules : या शिधापत्रिका धारकांना मिळणार गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांना सविस्तर वाचा…

SBI सोबत, बँक ऑफ बडोदाने सुद्धा आता ग्राहकांना सुधारित लॉकर करारावर निश्चित तारखेपर्यंत आपली स्वाक्षरी करण्याचे आवाहन केलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 23 जानेवारी 2023 रोजी ग्राहकांच्या दृष्टीने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सर्व बँकांनी लॉकरशी संबंधित नियम आणि करारांची माहिती सुद्धा त्वरित द्यावी. तसेच, ग्राहकांच्या ५० टक्के करारांमध्ये ३० जूनपर्यंत आणि ७५ टक्के करारांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत सुधारणा करण्यात याव्यात.SBI Customer Service

सुधारित नियमांनुसार आग, चोरी, दरोडा, बँकेचा निष्काळजीपणा किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही घटना घडल्यास बँकेकडूनच नुकसान भरपाई दिली जाईल. ही भरपाई वार्षिक भाड्याच्या 100 पट आहे.

Comments are closed.