Tuesday, February 27

Tractor Trolley Subsidy : ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी 50 टक्के सबसिडी, याप्रमाणे अर्ज करा.

Last Updated on July 20, 2023 by Jyoti Shinde

Tractor Trolley Subsidy

महा डीबीटी ट्रॅक्टर सबसिडी(Tractor Trolley Subsidy) : नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाविषयी एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे ट्रॅक्टर, मित्रांनो, कृषी आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणात वाढ झाल्यामुळे, सरकार यासाठी अनेक योजना राबवत आहे.

आता राज्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी 50 टक्के अनुदानही मिळणार आहे. यामुळे यांत्रिकीकरणाला गती येईल, असे चित्र आहे. मात्र लॉटरीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील यांत्रिकीकरण योजनेतील 1860 लाभार्थी निधीअभावी अनुदानासाठी प्रलंबित आहेत. या शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

राज्य सरकारची संपूर्ण राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना आहे. मजुरांची कमतरता आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे आता शेतात यंत्रसामग्रीची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारची आधुनिक यंत्रसामुग्री अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजना आहे. यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल. वैयक्तिक शेतकरी,तसेच महिला शेतकरी यासाठी आपले अर्ज करू शकतात. याशिवाय शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थाही अर्ज करू शकतात.

अनुदान मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले की, यावर्षीपासून सर्वसाधारण गटाला ट्रॉलीसाठी 45 टक्के, तर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

दिलेले देय अनुदान

2022-23 मध्ये 20 हजार 316 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली, 14 हजार 450 अर्ज फेटाळण्यात आले. तर 5765 शेतकऱ्यांना मान्यता मिळाली. 3903 शेतकऱ्यांना अनुदान दिले.
RKVI योजनेंतर्गत 160 शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ६४० शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे.
उपअभियानातील एक हजार शेतकरी प्रलंबित आहेत. एकूण 1860 शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

कोट

शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा. अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विविध गटांना ट्रॉलीवर ४५ ते ५० टक्के अनुदान दिले जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा: PVC Pipe Subsidy : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीव्हीसी पाईप आणि मोटरसाठी त्वरित ऑनलाइन अर्ज करा..

Comments are closed.