Grant Drip yojna २०२३
थोडं पण महत्वाचं
अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी ८० टक्के अनुदान
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन(Grant Drip yojna) योजनेअंतर्गत २५ आणि ३० टक्के असे ८० टक्के तर इतरांना ७५ टक्के अनुदान दिले जाते.
कसा अर्ज कराल?
महा ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा मोबाइलद्वारेही शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात. आपले सरकर डीबीटी पोर्टलवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येतो, यासाठी कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती, ८० टक्के अनुदान
अल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करण्यासाठी अनुदान देण्यात येते. दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ८० टक्के तर उर्वरित शेतकऱ्यांना ७५ टक्के इतके अनुदान देण्यात येते.
३००० शेतकऱ्यांना लाभ
अनुदान मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकयांची संख्या मोठी आहे. या वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली असून आतापर्यंत १६७ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण झाले.
कमी शेती आणि कमी पाण्यात भरपूर उत्पादन
पाटाद्वारे दिलेले पाणी पुरत नाही. पण ठिबक सिंचनाने हा प्रश्न सुटला. कमी पाण्यातही पिकांना पाणी देणे शक्य होत आहे.बाबूराव दुनबळे, शेतकरी
योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपले शिवार हिरवेगार करावे. यासाठी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांनी निवड केली जाते.कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक