
Last Updated on October 3, 2023 by Jyoti Shinde
BP health tips
नाशिक : जेव्हा जेव्हा हृदयविकाराची समस्या उद्भवते तेव्हा आपल्या शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. बहुतेक लोकांना या लक्षणांची माहिती नसते. तर आता आपण हृदयविकाराशी संबंधित लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत.
आजकाल या बदलत्या जीवनशैलीत आणि व्यस्त जगात अनेक प्रकारचे आजार उद्भवताना दिसतात. यातील बहुतांश लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
अतिरिक्त अन्नपदार्थ खाणे, शरीराची हालचाल न करणे, व्यायाम न करणे, ताणतणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे हृदयाचे आजार होतात. तसेच लठ्ठपणा आणि तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.BP health tips
हेही वाचा: Sandhe Dukhi Tips: छातीतील साधे दुखणे अन् हृदयरोग कसा ओळखायचा?
तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा छातीत दाब जाणवत असेल, तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार करा. कारण ही हृदयविकाराची लक्षणे आहेत. तुम्हाला छातीत दाब जाणवत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, तुमचे हृदय कमकुवत होऊ शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.BP health tips
बहुतेक लोकांना बीपीचा त्रास होतो. जेव्हा तुमचे बीपी वाढते तेव्हा ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. बीपी वाढल्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी तुमचे बीपी तपासत राहा आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.
हेहही वाचा: Scrub Typhus: देशातील अनेक राज्यांमध्ये स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव, काय आहे हा आजार? ही आहेत लक्षणे