breakfast tips : सावधगिरी बाळगा! चुकूनही रिकाम्या पोटी ‘या’ 4 गोष्टींचे सेवन करू नका, नाहीतर आतडे

Last Updated on May 30, 2023 by Jyoti Shinde

breakfast tips

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी काही खाल्ल्याने आतड्यांना हानी पोहोचते, त्यामुळे उठल्यानंतर दोन तासांनी नाश्ता करावा. नाश्त्यात काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हेल्थ टिप्स(breakfast tips) : तुम्ही नाश्त्यात काय खाता आणि काय नाही, या दिवसात स्वतःला तंदुरुस्त ठेवणं खूप गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, बहुतेक लोकांना नाश्त्यात जड पदार्थ खाणे आवडते, तर काही लोकांना हलके अन्न खाणे आवडते. म्हणूनच, आज या लेखात, आम्ही कोणते पदार्थ सकाळी रिकाम्या(breakfast tips) पोटी सेवन करू नयेत, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर देखील असू शकतात याबद्दल माहिती देणार आहोत.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी काही खाल्ल्याने आतड्यांना हानी पोहोचते, त्यामुळे उठल्यानंतर दोन तासांनी नाश्ता करावा. नाश्त्यात काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो . चला जाणून घेऊया तज्ञांकडून कोणते पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत आणि कोणते खावे .

लिंबूपाण्यात मध टाळा


मधासह लिंबू पाणी हे एक अगदी सामान्य पेय आहे जे बरेच लोक सकाळी सकाळी पित असतात. अनेकदा लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात मध मिसळून प्यायल्याने आपल्या शरीरातील चरबी हि कमी होत असते . आरोग्य तज्ज्ञ(breakfast tips) नेहा सहाय यांनी सकाळी याचे सेवन न करण्याचा आपल्याला सल्ला दिलेला आहे.breakfast tips

मधामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्या साखरेपेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा असतो. शुद्ध मध मिळणे कठीण आहे आणि बहुतेक लोक मधाच्या नावावर साखर आणि तांदूळ यांचे सरबत देखील करत असतात . त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. सकाळी याचे सेवन केल्याने जेवणाची लालस अजून वाढत जाते आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाण्यास लगेच सुरुवात करता.

रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी टाळा


सहाय म्हणाले की रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्याने पोटात ऍसिड तयार होते, ज्यामुळे तुमचे पोट खराब होते आणि पचनास त्रास होतो, त्यामुळे रिकाम्या पोटी चहा आणि कॉफीचे सेवन टाळा.breakfast tips

रिकाम्या पोटी फळ खाऊ नका

सहाय यांच्या मते, इतर अन्नपदार्थांपेक्षा फळे लवकर पचतात. ते खाल्ल्यानंतर तासाभरात भूक लागते. काही लिंबूवर्गीय फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने ऍसिडोसिस होऊ शकतो, म्हणून ते रिकाम्या पोटी खाणे टाळा.

नाश्त्यात गोड खाणे टाळा

रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी तज्ज्ञांनी नाश्त्यात गोड खाण्याऐवजी खारट खाण्याचा सल्ला दिलेला आहे. ज्यांना त्यांच्या फिटनेसचा मागोवा ठेवायचा आहे त्यांच्यासाठी हे योग्य आहे. प्रथिने आणि चरबीवर आधारित नाश्ता दिवसभर भूक कमी करण्यास आपणास मदत करतो आणि दुपारच्या जेवणापर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. नाश्त्यात गोड खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, त्यामुळे हे पदार्थ तुम्ही खाणे टाळा.breakfast tips

Comments are closed.