ओझोन थेरपीद्वारे कंबर दुखीला करा Bye Bye!!??

Last Updated on December 3, 2022 by Jyoti S.

आधुनिक जीवनशैली मानवी शरीरामध्ये अनेक आजारांना निमंत्रण देते. बैठे काम, व्यायामाचा अभाव, निकृष्ट आहार या बा अनेक समस्या उद्भवत आहेत. कंबरदुखी हा त्यातल्यात्यात सर्वाधिक आढळणारा आजार. स्त्रियामध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. कंबरदुखीची अनेक कारणे असू शकतात. त्यातील स्लिप डिस्क म्हणजे दोन चकती बाहेर येणे हे एक महत्वाचे कारण आहे. ही मज्जारज्जूच्या नसांवर दबाव टाकते तसेच नसेच्या आजूबाजूस सूज येते. अशावेळी कंबरदुखीच्या असह्य वेदना होतात. बरेचदा हे दुखणे पायापर्यंत जाते. मुंग्या येणे, होतो.” वाटणे, जळजळ होणे अशी लक्षणे त्या भागात दिसू लागतात. या आजारामुळे काही रुग्णांचे रोजचे दिनमान सुद्धा विस्कळीत होऊन जाते. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत कुणालाही है आजार होऊ शकतो. गोळ्या औषधे घेऊन वेदना कमी होतात, परंतु नसेवरील दबाव कमी होत नाही व रुग्णास पुन्हा पुन्हा वेदना होतात. अशा टाइम मध्ये ओझोन थेरपी लाभदायक ठरू शकते.

ओझोन म्हणजे काय?

वातावरणातील ओझोन वायू आपणास सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचिवतो, हे आपणास ठाऊकच आहे. एका विशिष्ट मशिनद्वारे ऑक्सिजनचे (ओ-२) रूपांतर मेडिकल ओझोनमध्ये ओ-३) केले जाते. विविध आजारांवर विविध पद्धतीने ओझोनचा वापर केला जातो.ओझोन थेरपी कशा पद्धतीने केली जाते ओझोन वायू दोनमधील चकतीमध्ये इंजेक्शनद्वारे सोडला जातो. हा वायू डिस्कमधील टॉक्सिन्स निकामी करतो, तसेच ओझोन डिस्कमधील द्रवरूप पाण्यात विरघळतो. त्यामुळे डिस्क आकुंचन पावते व नरोवरील दबाव कमी होतो.”

ओझोन थेरपी रुग्णाच्या दृष्टीने सुरक्षित आहे का?

ही शस्त्रक्रिया नाही. प्रशिक्षित डॉक्टर्सद्वारे सी-आर्म मशिनच्या सहायाने अगदी अनुक प्रोसिजर केली जाते. डिस्क लहान करण्यासाठीच्या पद्धती जसे Conventional Open Surgery, Micro surgery, Endoscopic Discectonomy याच्या तुलेत ओझोनचेरपी non-invasive आहे. त्यामुळे या थेरपीचे काहीही दुष्परिणाम नाहीत. पाश्चात्य देशांमध्ये स्लिप डिस्कच्या उपचारासाठी पहिली निवड ओझोन थेरपीचीच केली जाते.

ओझोन थेरपीचे फायदे काय?

यामध्ये चिरा द्याव्या लागत नाहीत, जखम होत नाही, पूर्ण भूल देण्याची गरज नाही. जागेवरची मूल पुरेशी असते. हॉस्पिटलमध्ये अधिक वेळ राहण्याची गरज नाही, रुग्णाला आपल्या कामावर लवकर होता.

ओझोन थेरपीनंतर घ्यावयाची काळजी

Dr.lodha Taluka Post | Marathi News

रुग्णाने ४८ तासांसाठी संपूर्ण आराम कराया. १ महिन्यापर्यंत जड वस्तू उचलू नये, वाकून काम करू नये. मणक्याचे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच सुरू करावेत. अशा या ओझोन थेरपीने आपण मणक्याची शस्त्रक्रिया टाळू शकतो. डॉ. नीलेश लोढा, पेन फिजिशिअन (एम.बी.बी.एस.एम.डी.) आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा