Tuesday, February 27

Diet Health tips: सकाळी-सकाळी उपाशीपोटी फळे खाणे योग्य की अयोग्य?

Last Updated on January 31, 2024 by Jyoti Shinde

Diet Health tips

गैरसमज नको : तज्ज्ञांचा सल्ला, जीवनसत्त्व आवश्यक

नाशिक : बदलत्या जीवनशैलीमुळे आहार-विहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले जाते. कित्येकदा त्याविषयी समज-गैरसमज पसरवले जातात. उपयुक्त पदार्थाविषयीदेखील मतभेद आहेत. सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नयेत असेही काही तज्ज्ञ मानतात. मात्र, उपाशीपोटी सीझनल फळे खाणे अत्यंत उपयुक्त असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे .

फल आहारामुळे शरीराला फायदाच होतो असे मत आहारतज्ज्ञ मीनल बाकरे शिंपी यांनी व्यक्त केले. सध्या नागरिक आरोग्याविषयी सजग झाले असून त्यामुळेच जॉगिंगबरोबरच जिममध्येदेखील गर्दी दिसते. प्रोटिन्स आणि अन्य काही विशेष पदार्थ जिम ट्रेनरने सुचवल्यानंतर असे सप्लिमेंट फूड घेण्यासाठीदेखील गर्दी होत असते. सामान्यपणे फळे ही सातत्याने उपलब्ध असली तरी त्यातही काही तज्ज्ञ वेगवेगळी मतेमतांतरे व्यक्त करतात. Diet Health tips

सकाळी उपाशीपोटी फळे खावीत काय याबाबतही मतभिन्नता आहे. सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नये असे काहींचे मत आहे तर फळे खाल्लीच पाहिजे असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

हेही वाचा: Todays Weather: थंडी कमी होऊन तापमान वाढणार, 11 राज्यांत पाऊस; संपूर्ण हवामान अहवाल वाचा

उपाशीपोटी काय खावे?

उपाशीपोटी केवळ फळेच नव्हे तर फळांचे ज्यूसदेखील घेता येतात. सध्या आवळ्याचे दिवस आहेत तर आवळा ज्युस, जिरं पाणी, तुळशीचे पाणी, लिंबू मा पाणी अशाप्रकारचे लिक्चिड डायट किवा ज्यूस सहज घेता येतो.(Diet Health tips)

ही फळे उपाशीपोटी खाणे टाळा

  • नाश्त्यापूर्वी म्हणजेच उपाशीपोटी फळे टाळा असे म्हटले जाते, मात्र त्याची गरज नाही. उलट अनेक जण नारत्यानंतर फळे स्वीट डीश म्हणून खातात ते अयोग्य आहे.
  • नाश्त्यापूर्वी फळे खाणे योग्य नसल्याचे सांगितले जाते मात्र, ते चुकीचे असून नास्त्यानंतर फळे घेतल्यास पचन आणि अन्य अडचणी येऊ शकतात.

■ उपाशीपोटी केवळ फ्रोजन फूड किया फ्रूटस घेऊ नये, किंबहुना ते सीझन- मधील तर घेऊच नये. निसर्गाच्या चक्रानुसार त्या त्या ऋतूत आलेली फळेच घ्यावीत अन्यथा त्रास होऊ शकतो.(Diet Health tips)

आपल्याकडे जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बोरे, चिचा किंवा तत्सम फळे मुले खात नाहीत त्यामुळे प्रतिकार शक्त्ती जुन्या पिढीच्या तुलनेत कमी आहे. ऋतुमानानुसार उपलब्ध फळे आवर्जून खावीत मात्र त्या ऋतूत नसलेली पण कृत्रिमपणे शीतगृहात ठेवलेली किंवा कार्बाईडच्या साहाय्याने पिकवलेली फळे खाऊ नये. ती हानिकारक ठरू शकतात