Last Updated on February 28, 2023 by Jyoti S.
Emergency medical help
थोडं पण महत्वाचं
Emergency medical help अपघात झाला, कोणी भाजले, कोणाला हृदयविकाराचा झटका आला किंवा एखाद्या महिलेला बाळंतपणासाठी धावपळ करावी लागली, तातडीच्या वैद्यकीय प्रतिसादासाठी 108 डायल करा.
अनेक लोक रुग्णवाहिका सेवेला मुकतात. मुंबईत जानेवारी 2022 जानेवारी 2023 दरम्यान एक लाखाहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
कोणाला फायदा होतो ते क्लिक करून पहा
108 क्रमांक काय आहे?
रुग्णांना आपत्कालीन(Emergency medical help) सेवा मिळावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात १०८ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यांनी या क्रमांकावर कॉल केल्यास त्यांना तातडीने डॉक्टरांनी सज्ज असलेली रुग्णवाहिका पाठवून मदत केली जाते.
हेही वाचा: Skin care : आपल्या चेहऱ्यावर वांग का पडतात? वांग घालवण्याचे सोपे उपाय घ्या जाणून
मुंबईत 900 हून अधिक आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद 108 रुग्णवाहिका आहेत
मुंबईत 108 अंतर्गत सुमारे 937 रुग्णवाहिका धावत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिका अनेकांसाठी वरदान ठरत आहेत.
हेही वाचा: sleep Health tips : मन:शांती नाही, रात्री झोप नाही? वास्तुनुसार हे 3 सोपे उपाय करून पहा