Saturday, February 24

Gomutra health tips: गोमूत्र प्यायल्यास काय होईल? संशोधनातुन समोर आली धोकादायक माहिती!

Last Updated on April 14, 2023 by Jyoti S.

Gomutra health tips

Gomutra health tips: खूप मोठी बातमी ते म्हणजे आता एका संशोधनात गोमूत्र पिण्याचे अनेक तोटे समोर आले आहेत. त्यात किती बॅक्टेरिया आहेत जे मानवासाठी किती प्रमाणात धोकादायक आहेत हे सर्व सांगितले जाते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्या देशात लाखो लोक आहेत जे जय हो गौ माता म्हणत गोमूत्राचे सेवन करत आहेत. गोमूत्र देखील पवित्र मानले जाते. गाईचा प्रत्येक अंग पवित्र असल्याचे सांगितले जाते. जे गोमूत्र(Gomutra health tips) भारतातील करोडो लोक शतकानुशतके पवित्र मानून पितात, ते पवित्र आहे परंतु आपल्या शरीराला नाही .

नाही, नाही… हे आम्ही म्हणत नसून एका संशोधनातुन ही बाब आता समोर आलेली आहे. तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की हे संशोधन कोणी केले? हे संशोधन बरेलीस्थित एका ICAR-Indian Veterinary Research Institute (IVRI) ने केलेलं आहे. प्राणी संशोधनासाठी ही देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे. या संशोधनानुसार, गोमूत्रात अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात, जे मानवांसाठी हानिकारक आहेत असं सांगण्यात आलाय .

हेही वाचा:General Knowledge : पपईसोबत हा पदार्थ खाल्ल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

अशा परिस्थितीत भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचा एक अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये गोमूत्र पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर म्हशीचे मूत्र हे गोमूत्रापेक्षा चांगले असल्याचेही या संशोधनात सांगण्यात आले आहे. चला तर मग आधी जाणून घेऊया गोमूत्र पिण्याचे काय तोटे आहेत.

हे संशोधन गोमूत्राबद्दल काय सांगतं?

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेतील (IVRI) काही विद्यार्थ्यांनी गोमूत्रावर संशोधन केले आहे. गोमूत्रात 14 प्रकारचे जीवाणू असतात आणि त्यापैकी बहुतेक एस्चेरिचिया कोलाय बॅक्टेरिया असतात असे त्यात नमूद केले आहे.

Escherichia coli मुळे मानवांमध्ये पोटाचे संक्रमण होऊन ते गंभीर आजारी होऊ शकतात. या संशोधनासाठी 73 गायी आणि म्हशींचे मूत्र गोळा करण्यात आले. यामध्ये साहिवाल, थारपारकर, विंडवी अशा अनेक गायींचा समावेश होता. यात लघवीमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आढळून आले जे अत्यंत हानिकारक असू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे .

एवढेच नाही तर म्हशीचे मूत्र हे गोमूत्रापेक्षा जास्त फायदेशीर असल्याचेही संशोधनातून समोर आले आहे. म्हशीच्या मूत्रात S. epidermidis आणि E. rapontici सारखे अधिक प्रभावी जिवाणू असतात जे आरोग्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीर असतात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Be Healthy : आरोग्यासाठी अत्यंत घातक! अशी चपाती कधीच भाजू नये त्यामुळे होतात …..

Comments are closed.