Health care news: वारंवार पेनकिलर घेताय? वाढतो ‘अल्सर’चा धोका !

Last Updated on October 6, 2023 by Jyoti Shinde

Health care news

आरोग्याची काळजी घ्या औषधांच्या बाबतीत मनमानी नकोच

नाशिक : माझं डोकं दुखतंय, सारखा

गुडघा दुखतोय, मग डॉक्टरांकडे सारखं कशाला धावायचं, त्यापेक्षा घरीच डॉक्टरांनी दिलेली पेनकिलर म्हणजेच वेदनाशामक गोळी घ्यायची म्हणजे त्रास कमी आणि कामेही सुरू राहातात, अशा प्रकाराच्या प्रवृत्तीमुळे परस्पर पेनकिलर घेण्याचे प्रमाण वाढत असून त्यामुळे अनेकांना अल्सरचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. खाणं-पिणं हा भाग वेगळाच; परंतु, त्रास होत असेल तरी तातडीने रिलीफ मिळून कामावर कसं जाता येईल. त्यामुळे साधी डोकेदुखी असो अथवा आणखी काही, तात्पुरत्या स्वरूपात रिलीफ मिळवण्यासाठी बिनधास्त पेनकिलर गोळ्या घेतल्या जातात.Health care news

वारंवार पेनकिलर नकोच कोणत्याही आजार असला तरी परस्पर सेल्फ मेडिकेशन म्हणून किंवा त्रास थांबण्यासाठी स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळले पाहिजेत, तसेच पेनकिलर विशेष करून थांबवल्या पाहिजे.

लहान आतड्याचा अल्सर

वारंवार पेनकिलर घेतल्याने शरीरावर परिणाम होतो. लहान आतड्यांवर जखमा होऊन अल्सर होऊ शकतो. पाणी पिण्यावर मर्यादा येऊ शकतात.Health care news

मोठ्या आतड्याचा अल्सर

लहान आतड्याप्रमाणे मोठ्या आतड्यालादेखील लहान लहान जखमा होऊन अल्सर बळावतो. काही वेळा रक्तस्रावदेखील होऊ शकतो.

अन्ननलिकेचा अल्सर

वारंवार पेनकिलर घेतल्याने जठरापासून अन्ननलिकेपर्यंत सर्वत्र फोड येऊ शकतात. म्हणजेच अल्सर होतो आणि त्यामुळे त्रासदेखील होतो.

वारंवार पेनकिलर नकोच

कोणत्याही आजार असला तरी परस्पर सेल्फ मेडिकेशन म्हणून किंवा बास थांबण्यासाठी स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळले पाहिजेत. तसेच पेनकिलर विशेष करून थांबवल्या पाहिजे.Health care news

काय काळजी घ्याल?

■ कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर संबंधित डॉक्टरांना त्वरित कळवावे, म्हणजे प्रीस्क्रिप्शन- शिवाय औषधे घेऊ नये आणि पेनकिलर औषधे घेतली तरी त्याची वैद्यकीय सल्ल्यानुसारच मात्रा घ्यावी.

नकार

■ काही आजारांत शस्त्रक्रिया करावी लागते, ती टाळण्यासाठी वारंवार औषधे घेतली जातात आणि त्याचा दुष्परिणाम होतो, त्यामुळे अशा कारणांसाठीदेखील पेनकिलर घेऊ नये.

पेनकिलर वैद्यकीय

सल्ल्याशिवाय घेऊ नये. अशा गोळ्यांचे वारंवार सेवन केल्याने लहान मोठे आतडे, जठर अन्ननलिकांना फोड येतो म्हणजेच अल्सर होतो, बऱ्याचदा रक्तस्राव होतो. बऱ्याचदा तर अशा पेनकिलरच्या अतिरेकी सेवनाने किडनीलादेखील धक्का पोहोचू शकतो.Health care new