Last Updated on January 11, 2023 by Jyoti S.
Health care : सर्दी, खोकला साधा समजू नका गंभीर आजारापेक्षाही अधिक धोका!!
Table of Contents
नाशिक(nashik) : जिल्हा रुग्णालयात दैनंदिन बाह्यरुग्ण विभागात दररोज असंख्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. सर्दी, विभाग खोकल्याच्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी इतर गंभीर आजाराचे रुग्ण देखील दाखल होत असतात जिल्हा उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये ग्रामीण, आदिवासी पोहचतात तर अनेकदा बन्याच दिवसांपासून बरे वाटत नाही म्हणून ओपीडीमध्ये डॉक्टरांना येऊन दाखवतात.
तोवर किरकोळ वाटणारा आजारही गंभीर होऊन जातो. कित्येकदा सर्दी, खोकल्याच्या(Health care) रुग्णाला कोरोनाची चाचणी करावी लागते. टीबीचाही धोका संभवतो. त्यामुळे सर्दी, खोकला हलक्यात घेऊ नका, असा सल्लाच डॉक्टरांकडून दिला जातो.
जिल्हा रुग्णालयात विविध प्रकारचे बाह्य रुग्ण विभाग असून या ठिकाणी दररोज किमान १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. यामध्ये आपत्कालीन विभागातील रुग्णांची संख्या तर अधिक असते.
या आजारांचे रुग्ण वाढले
न्यूमोनिया
दैनंदिन ओपीडीवरील रुग्णाच्या तक्रारीवरून न्यूमोनियाचे(Pneumonia) रुग्ण वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आजाराकडे दुर्लक्ष केल्याने न्यूमोनिया वाढत आहे.
त्वचारोग
वर्षभरात त्वचारोगाबाबत(Health care) रुग्ण वाढले असल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात ३५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी त्वचारोगाचे(Skincare) निदान केले. ग्रामीण रुग्णांची संख्या अधिक आहे.
सर्दी-खोकला
सर्दी, खोकल्याच्या(Cold-cough) रुग्णांची संख्या अधिक आहे. बदलत्या वातावरणामुळे होणारा कफ, सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. संधिवाताच्याही तक्रारी आल्या आहेत.
कोरोना रुग्णाचा धोका
पुरवठ्यासाठी घेतल जिल्हा रुग्णालयात थंडीताप, सदी, खोकल्याचे सण असल्याचे दिसत असले तरी अशा रुग्णामध्ये कोरोनाणाचा(Covid-19) धोका असू शकतो. त्यामुळे असे कृष्ण तपासताना अधिक काळजी घ्यावी.

सर्वाधिक रुग्ण सर्दी,खोकल्याचे
जिल्हा रुग्णालयातील ओपीडीमध्ये(OPD) सर्दी, खोकल्याच्या उपचारासाठी सर्वाधिक रुग्ण येत असतात. यामध्ये ग्रामीण आणि शहरी रुग्णांचा समावेश आहे.
आरोग्याकडे दुर्लक्ष; नियमित उपचाराचा अभाव
नाशिक(Nashik) जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते. आजारपणाविषयी असलेले रुग्ण तसेच उपचाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजार बळावतो आणि त्यामुळे असे रुग्ण जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचतात.
हेही वाचा: Nose health tips : म्हणूनच तुमचे नाक नेहमीच थंड होते-हिवाळा नसतानाही!!
बाह्य रुग्ण विभागात नियमित तपासणीपेक्षा आजार अधिक बळावल्यानंतर येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते किंवा फोलोअपसाठी यांची येणारे रुग्णही असतात.
शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्याच्या अनेक सुविधा आणि यंत्रणा असतानाही आरोग्यविषयक(Health care) जागरुकता दाखवली जात नसल्याने किरकोळ आजारही बळावत जातो. त्यातून अनेक वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होते.