Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.
Health tips Guava : थंडीत पेरू खा अन् शुगर नियंत्रणात ठेवा !
नाशिक: पेरू हे नाशवंत फळ असून, ते जास्त काळ टिकत नाही. नियमित पेरू(Guava) खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही तसेच थंडीच्या बहरातील पेरू खाल्ल्यास रक्तातील साखर अर्थात ब्लडशुगर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते, असे मानले जाते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येवर सकाळच्या वेळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे फायद्याचे ठरते.
बाजारात विविध प्रकारचे पेरू
बाजारात पेरू विविध आकार, प्रकारात मिळत असले तरी सामान्यपणे पेरूच्या(Guava) दोन जाती आहेत. एका जातीमध्ये पांढरा तर दुसया जातीमध्ये गुलाबी गर असतो. दोन्हीही जातीचे पेरू चवीने गोड व थोडेसे तुरट असतात. अनेक पक्षी पेरू आवडीने खातात. आवळ्याच्या खालोखाल भरपूर प्रमाणात क जीवनसत्व देणारे फळ म्हणून पेरू ओळखला जातो.
पेरुचा दर ४० रुपये
पेरूमध्ये क जीवनसत्व असून, हे फळ बुद्धिवर्धक 9 असण्याबरोबरच मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त करून ‘देणारे मानले जाते. तसेच हिवाळ्यात पेरू हा ४० ते ५० रुपये किलोने मिळत असल्याने तो कुणाही सर्वसामान्याला उपलब्ध होऊ शकतो. हेही वाचा: health care: तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान!
पेरूच्या पानाचाही उपयोग
काही लोकांच्या तोंडामध्ये दुर्गंध येते. त्यासाठी पेरूची(Guava) पाने तोंडामध्ये ठेवून चावल्यास दुर्गध वास कमी होण्यास मदत होते. तसेच आपणास दात दुखण्याचा त्रास असेल तर तोही बऱ्याच प्रमाणात कमी होतो. तसेच पेरू आणि पानामध्येदेखील पोटॅशिअम आणि तंतूच्या जास्त प्रमाणामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्तीत वाढ
पेरू खाल्ल्यामुळे त्यातील जीवनसत्त्व ‘अच्या माध्यमातून डोळ्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते. पेरूच्या(Guava) सालीमध्ये अँटीऑक्सिडंटसोबत इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो, जे शरीरास फायदेशीर असतात. लहान बालके,तसेच अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी सर्वानी पेरूचे नियमित सेवन केले पाहिजे. पेरूतील जीवनसत्व क आणि इतर पौष्टिक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीर सुदृढ व मजबूत होते. पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करतो.