Health tips plastic bottle :प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताय? त्यामुळे वाढू शकता विकार बघा.

Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.

Health tips plastic bottle :प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताय? वाढू शकतो मधुमेह.

पोटाचे विकार वाढण्याचा धोका : बाटलीनिर्मितीत रसायनांचा झालेला वापर ठरू शकतो घातक

नाशिक : अनेकदा प्लास्टिकची पाण्याची बाटली प्रवासात तसेच अनेक जण सोबत ठेवून त्यातूनच पाणी पितात. मात्र, ह्या प्लास्टिकच्या बाटल्या बऱ्याच रसायनांचा वापर करून बनलेल्या असतात, हेच अनेकांना ज्ञात नसते. ही घातक रसायने बाटली उन्हाच्या संपर्कात येऊन पाणी गरम होताच पाण्यात मिसळतात. ही रसायने पोटात गेल्याने पोटाचे विविध आजार आणि मधुमेहासारखे आजारदेखील जडू शकतात.

काचेच्या बाटलीत पाणी कितीही दिवस राहू शकते. मात्र, प्लास्टिकच्या बाटलीमध्ये जर जास्त दिवस पाणी ठेवला तर त्याची चव बदलते. पाण्याची प्लास्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

इकडे लक्ष द्या!!!.

प्लास्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जिवाणूंची पैदास होऊ शकते. त्यात अगदी बालकांपासून ते वयस्कर

व्यक्तीपर्यंत बहुतांश नागरिक प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताना दिसतात. त्यांना या पाण्याचे घातक दुष्परिणाम समजणे अत्यावश्यक आहे.

पुरुषांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण बिघडू शकते. लिव्हरचे नुकसान होऊ शकते, तसेच महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोकादेखील नाकारता येत नाही.

प्लास्टिक बाटलीचा पुनर्वापर विषासमान(Health tips plastic bottle)

हेही वाचा: Ration rice: रेशनच्या तांदळामुळे वाढणार तुमच्या शरीरातील लोह कसे ते बघा!

प्लास्टिकच्या कोणत्याही बाटलीचा पुनर्वापर करू नये. अनेक नागरिक कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांना धुऊन त्याचा अनेकदा पुनर्वापर करतात, तेदेखील अयोग्य असते. या बाटल्यांच्या वरच्या बाजूला एक त्रिकोण असतो, त्यावर १ लिहिलेले असते.

त्याचाच अर्थ असा आहे कि आपण या बाटलीचा केवळ एकदाच वापर होऊ शकतो. प्लास्टिकच्या बाटलीऐवजी बाजारात मिळणाऱ्या स्टीलच्या बाटल्या, तांब्याच्या बाटल्यांचा वापर केव्हाही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.

प्लास्टिक बाटलीचा वापर एकदाच

घराबाहेर असल्यास आणि पाणी विकतच घ्यावे लागल्यास प्लास्टिकच्या बाटलीत(Health tips plastic bottle) मिळणारे पाणी ती बाटली संपेपर्यंत एकदाच प्यावे. तसेच ती बाटली पूर्ण चोळामोळा करून फेकून दिल्यास त्या बाटलीचा वापर त्यानंतर पुन्हा कुणालाही करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रवासातही प्लास्टिकची बाटली वापरावी लागली तरी पाणी संपल्यानंतर ती तशीच न फेकता तिची विल्हेवाट लावावी.हेही वाचा: Ginger: जेव्हा तुम्ही महिनाभर अदरक रोज खाता तेव्हा तुमच्या शरीरात असे घडते

त्याचाच अर्थ असा आहे कि आपण या बाटलीचा केवळ एकदाच वापर होऊ शकतो. प्लास्टिकच्या बाटलीऐवजी बाजारात मिळणाऱ्या स्टीलच्या बाटल्या, तांब्याच्या बाटल्यांचा वापर केव्हाही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिण्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. तसेच जर त्या बाटलीचा पुनर्वापर होत असेल तर तो विषासमान असून त्यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळते. अशा प्रकारचे पाणी पोटात जाऊन बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

काय आहेत धोके ?

प्लास्टिक एक पॉलीमर आहे. , हायड्रोजन ऑक्सिजन,प्लास्टिक कार्बन आणि क्लोराइड हे सर्व मिळून बनते. त्याशिवाय प्लास्टिकमध्ये एक केमिकल आढळते. केमिकल आणि पॉलीमरमध्ये आढळणारी तत्त्वे आपल्या शरीरात गेली तर पोटाचे अनेक आजार होऊ शकतात.

Comments are closed.