Last Updated on April 13, 2023 by Jyoti S.
Onion health tips
थोडं पण महत्वाचं
उन्हाळ्यात कांदा(Onion health tips) : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणे आता खूपच आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. त्यासाठी आजपासूनच कच्चा खंडा खाण्यास सुरुवात केली तर खूप फायदा होऊ शकतो.
अनेकांना जेवणासोबत कच्चा कांदा खाण्याची खूप सवय असते. काही लोक अन्नासोबत कच्चा कांदा खातात. पण आता कच्चा कांदा खावा की नाही हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर हरकत नाही. कच्चा कांदा आरोग्यासाठी चांगला असतो. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. ज्यांना भूक लागत नाही त्यांनी आजपासूनच कच्चा कांदा खायला सुरुवात करावी. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल.
सध्या उन्हाळा सुरू होत आहे. अशा स्थिती मध्ये आपण आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणे खूपच गरजेचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन केले पाहिजे. कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्व मिळत असतात .
यंदा उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही स्वतःची विशेष काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. मुंबईसह काही ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईचे तापमान हे पूर्ण पने ३७ अंशांवर जाऊन पोहोचले होते. यासोबतच उष्णतेचा कहर वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात तापमान हे ४५ अंशांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच स्वतःच्या शरीराला हायड्रेट ठेवणेहि गरजेचे असते.
हेही वाचा: Papad festival : पापडप्रेमींसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच पापड उत्सव साजरा होणार आहे.
आपल्या स्वतःच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी बरीचशी लोक हे लस्सी, शिकंजी इत्यादी पदार्थांचे सेवन करत असतात . पण तुम्हाला माहीत आहे का कांदा तुम्हाला या कडक उन्हापासून दिलासा देऊ शकतो. होय, उन्हाळ्यात कांदा जरूर खावा.
हे आहेत कांदा खाण्याचे फायदे
– उन्हाळ्यात कांदा खाण्याचा फायदा म्हणजे उष्माघातापासून संरक्षण. कांदा तुम्हाला उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतो. म्हणूनच उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचा सल्ला प्रत्येक जणांकडून दिला जातो. उष्णतेपासून आपण सर्वानी आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी कांद्याचे सेवन केले जाऊ शकते.
– कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत आणि उष्णतेची लाटही सुरू झाली आहे. अश्या स्थितीमध्ये तुम्ही कांद्याचे सेवन करणे आता खूपच फायदेशीर देखील ठरू शकते. कांद्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे सुद्धा काम चांगल्या प्रकारे करत असतात. तसेच ते शरीराला आतून थंड ठेवतात.
– कच्चा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात बहुतेकांना पचनाच्या समस्या होतात. अशा परिस्थितीत कच्च्या कांद्याचे सेवन केले पाहिजे, ते पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. हे सेवन करताना तुम्ही त्यात लिंबाचा रस देखील टाकू शकता. असे केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून देखील आता आराम मिळतो.