सकाळी लवकर उठणारे लोक असतात स्मार्ट

Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.

रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर लवकर उठणे हा आरोग्य जीवनाचा मंत्र मानला जातो. पण शहरीकरण, तसेच वाढती व्यावसायिक स्पर्धा आणि मानसिक ताणतणावांमुळे अनेक लोकांना रात्री लवकर झोप येत नाही. त्यामुळेच त्या लोकांना सकाळी लवकर जागही येत नाही. हे असे वागणे आरोग्यासाठी घातक असते, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे . मात्र या संबंधात झालेल्या ताज्या संशोधनातून सकाळी लवकर उठण्याचे काही वेगळे लाभ समोर आले आहेत. नव्या संशोधनानमधून असे आढळून आले आहे की, सकाळी लवकर उठणारे लोक जास्त स्मार्ट असतात.

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांचा मेंदू तुलनेने जास्त काम कण्याचा लायक असतो. अशीच लोक आपले म्हणणे योग्य प्रकारे दुसऱ्यांसमोर मांडू शकतात. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या व्यथाही असे लोक समजू शकतात. अशी माणसे आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम सुद्धा चांगल्या प्रकारे सोल्व करू शकतात. कॅनडाच्या ओटावा युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, माणसाच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीचा त्याच्या बुद्धिमत्तेवर काय आणि किती प्रमाणात प्रभाव पडतो. या संशोधनामध्ये त्यांनी सर्व वयोगटातील लोकांचा समावेश केला होता. या लोकांचा दिनक्रम ट्रॅक करण्यासाठी एक खास असा डिव्हाईस लावण्यात आला होता.

याच विषयावर झालेल्या एका दुसऱ्या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांच्या मेंदूला कमी विश्रांती मिळते. त्याचमुळे दिवसा अशी माणसे आपल्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशी माणसे दिवसभर झोपेत असल्यासारखी वागतात. मात्र सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांना चांगल्या प्रमाणात आराम मिळत असल्याने अशी माणसे दिवसा जास्त अग्रेसिव्ह राहतात.बऱ्याच प्रकरणांतुन असे दिसून आले आहे की, आपली पचनशक्ती, डोळ्यातील रेटिना आणि बॉडी क्लॉक आपल्या झोपणे आणि उठण्याचा क्रम ठरवत असतात.

लहान मुलांना आवडते रात्री जागणे या संशोधनामध्ये सहभागी लोकांचे बॉडी क्लॉक तपासण्यात आले. याच अभ्यासातून असेहि आढळून आले की, लहान मुलांना रात्रीउशिरापर्यंत जागणे खूप आवडते. तर दुसरीकडे वयस्कर लोक रात्री लवकर झोपी जातात आणि सकाळी लवकरात लवकर उठतात. आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.