Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.
Ration rice : फोर्टीफाइड पोषणमूल्य असलेल्या तांदळाचे होतेय वितरण
नाशिक(Ration rice) : लोहयुक्त पोषणमूल्य असलेला फोटीफाईड तांदळाचे वितरण नाशिक जिल्ह्यातून रेशनदुकानांमधून केले जात आहे. शरीरातील सूक्ष्म पोषक तत्त्वांची भरून काढण्यासाठी लोहयुक्त फोर्टीफाईड तांदळाचे वितरण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्याला फोर्टीफाईड तांदूळ वितरित केला जात आहे. शालेय पोषण आहारातून विद्याथ्र्यांना या तांदळाचा अधिक लाभ होत आहे. तत्त्वांची कमतरता पोषक पापक भरून काढण्यासाठी तांदळाची निर्मिती करण्यात आली आहे. नियमित तांदळामध्ये काही प्रमाणात हा तांदूळ मिसळून त्याचे वितरण केले जाते.
एक किलो तांदळात ‘फोर्टीफाइड किती?
फाटीफाईड तांदळातील किती पोषणमूल्य शरीरासाठी उपयुक्त आहेत याचे प्रमाण निश्चित आहे. फोटीफाईड तादूळ व नियमित तांदूळ याचे प्रमाण १:२०० आहे.
म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टीफाईड तांदळाचे प्रमाण १ किलोमध्ये १० ग्रॅम या प्रमाणात आहे.हेही वाचा: Ration: रेशन ‘या’ महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..
सर्वसामान्यांना पोषणमूल्यांचा डोस
सर्वसामान्यांना पोषण आहार(Ration rice) मिळावा, त्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण भरून निघावे यासाठी पोषणमूल्य •असलेला फोर्टीफाईड तांदूळ तयार करण्यात आला आहे. एका किलोत दहा ग्रॅम याप्रमाणे हा तांदूळ मिसळला जातो. रेशनमधून मिळणाऱ्या तांदळातून हा तांदूळ दिला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात वितरण सुरु
■ आहारातील पोषणमूल्य वाढावे, शरीरातील लोहाचे प्रमाण वाढावे “यासाठी फोर्टीफाईड तांदूळ राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये वितरित केला जात आहे.
■ आदिवासीबहुल भाग असल्याने नाशिक जिल्ह्यातूनदेखील अशा ‘तांदूळ वितरणाला रेशनमधून सुरुवात झाली आहे.
फोर्टीफाइड तांदळातून वाढते लोह
विटॅमिन ए. बी. फोलिक अॅसिड, झेनिक व्हिटॅमिन अशा पोषक घटकांचा समावेश.
विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे .
रुग्णांसाठी हा तांदूळ लाभदायी ठरत आहे. तांदूळ पोषणमूल्य असलेला, प्रयोगशाळेत सिद्ध झाला.