Sandhe dukhi tips: छातीतील साधे दुखणे अन् हृदयरोग कसा ओळखायचा?

Last Updated on September 28, 2023 by Jyoti Shinde

Sandhe dukhi tips

वेदना नक्की कोणत्या कारणामुळे त्याबाबत नागरिकांना संभ्रम

नाशिक : कायमची व्यस्त जीवनशैली खाण्यापिण्यामध्ये होत असलेली हेळसांड यामुळे हृदयविकाराशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकांना तर हृदयविकाराचा झटका आल्याचे किंवा येऊन गेल्याचेही कळत नाही. त्यांना वाटते अॅसिडिटीमुळे जळजळ झाली किंवा वजन उचलल्याने छाती, पाठीत दुखले असेल. त्यामुळे या संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी छातीत जळजळस्नायूंचे दुखणे तसेच साधारण हृदयविकाराचा झटका यातील फरक समजून घेतल्यास वेळीच योग्य खबरदारी घेणे शक्य होते.Sandhe dukhi tips

हार्ट अटॅक आणि छातीत होणाऱ्या वेदना यातील फरक सूक्ष्म असतो. मात्र, तो समजून घेतल्यास पुढील अनर्थ टाळता येतो. अन्यथा अनेकदा केवळ तज्ज्ञांकडून दिला जातो. सर्दी, खोकल्यामुळे थोडेसे दुखतेय किंवा आज खूप कामाचा ताण होता म्हणून आता थोडे फार दुखत असेल, असे समजून दुर्लक्ष केले जाते. हे दुर्लक्षच मग पुढील संकटाला जणू आमंत्रण देण्याचे काम करते.


हेही वाचा: Specializing In Mental Health: ‘या’ कारणांमुळे मुलं होत आहेत ऐकलं कुंडी!

छातीतील साधे दुखणे

साधारण वेदना या गळ्यापर्यंत जात नाहीत. साधारण वेदना कोणत्याही वजनामुळे वाढत नाहीत. स्नायूंचे दुखणे, नसांचे दुखणे, खांद्याचे दुखणेअॅसिड रिफ्लक्स अर्थात छातीत जळजळ, गॅसेसमुळे छातीवर दबाव वाटणे ही दुखणी निराळी असतात हे लक्षात घ्यायला हवे काय काळजी घ्याल?Sandhe dukhi tips

ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा धास्ती वाटते, त्यांनी आपल्या पाकिटात टॅब्लेट इकोस्प्रिन किंवा डिस्प्रिन गोळी सातत्याने ठेवावी. जेव्हा कुणालाही छातीत प्रचंड वेदना होताहेत, असे वाटू लागेल, त्या क्षणाला इकोस्प्रिन किंवा डिस्प्रिनची गोळी चावून किंवा पाण्यात घुसळून पिऊन घेण्याचाही सल्ला इकोस्प्रिन किंवा डिस्प्रिनची गोळी चावून किंवा पाण्यात घुसळून पिऊन घेण्याचाही सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.”

हृदयविकाराशी संबंधित दुखणे

हृदयविकाराच्या वेदना एका ठिकाणाहून दुसया ठिकाणी जाऊ शकतात. त्या वेदना साधारणपणे ५ ते १५ मिनिटे राहू शकतात. श्वास कोंडणे, छाती कोणी तरी फाडून टाकतंय असे वाटणे, छाती भरलेली वाटणे, छातीवर काही भार ठेवलाय, चक्कर, मळमळ असे वाटू लागेल. छातीमधून जबडा, गळा आणि डाव्या बाजूपर्यंत या वेदना जाणवू लागतात. १५ मिनिटांनंतर त्या वेदना अनेकदा कमी होतात. हृदयविकाराच्या वेदना या अधिक काळ राहतात.Sandhe dukhi tips

हेही वाचा: Tomato Price: टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार उचलणार मोठे पाऊल?

हृदयरोग तज्ज्ञ काय म्हणतात?

जेव्हा छातीत प्रचंड दुखायला लागेल किवा ही वेदना हृदयविकाराची आहे असा संशय येईल, त्यावेळी संबंधित रुग्णाला दीर्घ श्वास घेऊन चार-पाच वेळा जोरात खोकायला सांगावे. तसे केल्यास रक्ताची गुठळी होण्याच्या प्रक्रियेला आळा बसतो. इकोस्प्रिन किया डिस्प्रिनची गोळी जवळ असल्यास ती रुग्णाच्या तोंडात ठेवावी. तसेच, रुग्णाला हालचाल करू न देता तातडीने रुग्णालयात नेऊन ईसीजी काढण्यासह तातडीने उपचार केल्यास धोका नियंत्रणात राखणे शक्य होऊ शकते.