Skin Care: त्वचेची कशी करावी देखभाल? सकाळी उठल्यानंतर करा ही महत्त्वाची कामे

Last Updated on June 22, 2023 by Jyoti Shinde

Skin Care Tips :आपली त्वचा चमकदार राहावी यासाठी तुम्ही आतापर्यंत खुप वेगवेगळे उपाय करून पाहिले असतीलच

पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही आपल्या त्वचेची अशा प्रकारे काळजी घेतली आहे का? हे रुटीन फॉलो केल्यास तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

धावपळीच्या आयुष्यामध्ये त्वचेची देखभाल करणे अनेकींना शक्य होत नाही. काही महिला दररोज रात्री न चुकता Skin Care Tips फॉलो करतात. परंतु सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा फक्त फेस वॉशनेच स्वच्छ करतात. यामुळे त्वचेला कोणते लाभ मिळत नाहीत. मी आज तुम्हाला काही एम्पॉर्टन्ट मॉर्निंग स्किन केअर रुटीनबाबत माहिती देणार आहो तरी आपण त्या माहितीचा लाभ घ्यावा . या गोष्टींचे पालन केल्यास तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होईल

थंड पाण्याने चेहरा धुणे

सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुणे. थंड पाणी आपल्या चेहऱ्यासाठी अँटी रिंकल एजेंटच्या स्वरुपातही कार्य करते. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते आणि तुमची त्वचा सैल देखील होणार नाही. सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही आपल्या त्वचेचे संरक्षण होते. सकाळी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळते.

टोनर लावणे

सकाळी त्वचेला चांगल्या पद्धतीने स्वच्छ, आणि मॉइश्चराइझ देखील करावे. गुलाब पाणी हे एक चांगले आणि नैसर्गिक टोनर आहे .गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद होतात आणि त्वचा फ्रेश राहते.टोनर लावल्यानंतर आपल्या त्वचेचा प्रकार बघून त्यावर मॉइश्चराइझ लावणे.

​त्वचा हायड्रेट ठेवा

आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आनाशी पोटी द्रव पदार्थांचे सेवन करावे. आपली त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं खूप गरजेचं आहे. आपले शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स केल्यानंतर चमक येण्यास मदत मिळते. यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. आपण आहार तज्ज्ञांच्या सल्यानुसार नारळ पाणी आणि ग्रीन टी प्यावे.
(Skin Care जाणून घ्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी)

​ग्लिसरीनचा वापर

सम प्रमाणात लिंबू , गुलाब पाणी रस एकत्र करा आणि यामध्ये ग्लिसरमिक्स करा. हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर रोज लावावे. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपला संपूर्ण चेहऱ्यावर हे नॅचलर सीरम लावावे .ग्लिसरीन आपल्या चेहऱ्यासाठी क्लींझरच्या स्वरुपात काम करते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेलकट पण स्वच्छ होतो. ग्लिसरीनमध्ये मॉइस्चराइझिंग चे गुणधर्म आहेत. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो.

(Skin Care चमकदार त्वचेसाठी आंघोळीचा आधी लावा फक्त ५ मिनिटे बेसन फेस स्क्रब)

​मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी माती (Fuller Earth) कशी असते असं कोणाला माहीत नसेल असं नाही. सर्वात जास्त वापरली जाणारी ही माती आपल्या सौंदर्यासाठी खूपच उपयुक्त ठरते असं म्हणतात. अर्थात आपली त्वचा अधिक चांगली होण्यासाठी क्लिन्झिंग म्हणून मुलतानी माती काम करते. आपली त्वचा अधिक मुलायम बनवण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग होतो. मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्यास, त्वचेवरील डेड स्किन निघून जाते व त्वचा तजेलदार आणि अधिक चमकदार होते.

हेही वाचा: 11th Admission Process : अकरावीची प्रवेश यादी आज जाहीर होणार, प्रवेश घेतला नाही तर…

शिवाय मुलतानी माती हा उत्कृष्ट प्रकारचा चेहऱ्यासाठी मास्क आहे आणि त्यामुळेच इतर रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करण्यापेक्षा मुलतानी मातीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर लावताना तो ओला असतो नंतर सुकतो.’ याचा अर्थ आपल्या चेहऱ्यावरील अधिक तेल मुलतानी माती काढून टाकत असत.

(skin care तेलकट त्वचेसाठी मध – टॉमेटो आणि लिंबाच्या रसासह फेसपॅक करून लावणे)

​सनस्क्रीन

चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे सनस्‍क्रीन लावणे आवश्यक आहे. सनस्क्रीनमुळे चेहऱ्यावरील डाग खुपच कमी होण्यास मदत मिळते. परंतु तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सनस्क्रीनचा वापर करायला पाहिजे .

NOTE : चेहऱ्यावरील कुठलाही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Comments are closed.