महिलेच्या पोटातून काढला चार किलोचा गोळा

Last Updated on December 3, 2022 by Jyoti S.

नाशिक : येथील २८ वर्षीय महिलेच्या पोटातून चार किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. भाभा नगर येथील पुरंदरे हॉस्पिटल येथे डॉ. प्रशांत पुरंदरे, डॉ. गौरी पिंप्राळीकर, डॉ. दिनेश जोशी व भूल तज्ज्ञ डॉ. अभिनंदन रायसोनी यांनी अडीच तासांत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. सदर महिलेला गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण् अडचण येत होती. त्यांच्या विवाहाला दोन वर्ष उलटूनही त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही.. त्यांची सोनोग्राफी व सिटी स्कॅन करण्यात आले. त्यात त्यांच्या पोटात तीन लिटर पाणी असलेली गाठ बिजांडकोशाच्या जवळ दिसत होती.

नाशिक : महिलेवर शस्त्रक्रिया करताना प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत पुरंदरे व डॉ. गौरी पिंप्राळीकर.

4 kilo gola Taluka Post | Marathi News

आवश्यकता पडली तर बिजांड कोष काढावे लागेल, याची पूर्व कल्पनामहिलेच्या कुटुंबीयांना देऊन त्यांच्या संमतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून . चार किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. हा गोळा गर्भनलिकेजवळ होता. महिलेचे बिजांडकोष शाबूत ठेऊन ही यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने महिलेच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.