Last Updated on December 28, 2022 by Jyoti S.
Booster dose: ‘आयएमए’ची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे शिफारस
Booster dose: कोरोनाच्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण अभियानात चौथा डोस समाविष्ट करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने नागरिकांना संपूर्ण लसीकरण तसेच बूस्टर डोसनंतर आणखी एक बूस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह आयएमएने घरला आहे. देशातील बूस्टर डोस संदर्भातील आकडेवारी मात्र निराशाजनक आरोग्यमंत्र्यांनी केली मॉकड्रिलची पाहणी.
कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांनी | आपल्या सुसज्जतेला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील प्रमुख रुग्णालयांमध्ये मंगळवारी कोव्हिड प्रतिसादात्मक मॉक ड्रिल करण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात जाऊन या मॉक ड्रिलची पाहणी केली .
‘सध्याच्या परिस्थितीत हे मॉक ड्रिल अत्यंत आवश्यक होते, असे मांडवीय यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. रुग्णालयांना आवश्यक ती उपकरणांची पूर्तता भरून काढण्यास सांगण्यात आले असून गरजेनुसार मनुष्यबळ तैनातीचे निर्देश देण्यात आले.हेही वाचा: Wheat News: गहू आणि पिठाचे दर कमी होणार..? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..!!
देशात आतापर्यंत फक्त २२.३७ कोटींच्या घरात बूस्टर डोस हे लावण्यात आल्याची माहिती आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे बूस्टर डोस(Booster dose) सक्तीचे करण्याबाबत सरकारकडून चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. बूस्टर डोस देण्याचे ख काम संथ गतीने सुरू आहे. अशात चीनसह इतर देशांमधे उद्भवलेल्या परिस्थितीनंतरच चौथा डोस देण्याची शिफारस केली जात असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने अजूनही या बाबतीत निर्णय घेतलेला नाही.