Booster dose: नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोनी लसीची किंमत समोर, ‘इतके’ पैसे मोजावे लागणार..!!

Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.

Booster dose: नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोनी लसीची किंमत समोर, ‘इतके’ पैसे मोजावे लागणार..!!

जगभर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढू लागल्याने भारत सरकार सतर्क झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड लसीला (नेझल व्हॅक्सिन) (Booster dose)मान्यता दिली असून, खासगी रुग्णालयामार्फत ही लस दिली जाणार आहे. या लसीच्या किमतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

किती पैसे लागणार..?

नाकावाटे देण्यात येणाऱ्या iNCOVACC लसीसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयात 800 + 5 टक्के जीएसटी, असे एकूण 1000 रुपये मोजावे लागतील, तर सरकारी रुग्णालयात ही लस 325 रुपयांना मिळणार आहे.हेही वाच: Nashik covid updates: दहा टक्के नाशिककर अजूनही पहिला डोस घेईना!

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना ‘नेझल व्हॅक्सिन’ बुस्टर डोस(Booster dose) म्हणून घेता येणार आहे. नवीन वर्षात, अर्थात जानेवारी-2023 लपासून ही लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.