Last Updated on January 4, 2023 by Taluka Post
Cholesterol level: तुमच्या वयोमानानुसार तुमची कोलेस्ट्रॉल लेवल किती असली पाहिजे ?
Cholesterol level
१९ वयोगटातील व्यक्तींची कोलेस्ट्रॉल लेवल :-
१९ वर्षांपर्यंतच्या तरुणांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल १७० मि.ग्रॅ./ डीएल पेक्षा कमी असले पाहिजे. याचे नॉन- एचडीएल १२० मि.ग्रॅ./ डीएलपेक्षा कमी आणि एलडीएल १०० मि. ग्रॅ./डीएलपेक्षा कमी असले पाहिजे. तर एचडीएल ४५ मि.ग्रॅ./ डीएलपेक्षा जास्त असलं पाहिजे.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
२० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांची कोलेस्ट्रॉल पातळी
२० पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचे टोटल कोलेस्ट्रॉल १२५ – २०० मि. ग्रॅ./डीएलच्या मध्ये असले पाहिजे. तर दुसरीकडे नॉन- एचडीएल लेवल १३० मि.ग्रॅ./ डीएल पेक्षा कमी आणि एलडीएल लेवल १०० मि.ग्रॅ./डीएलपेक्षा कमी असायला पाहिजे. एचडीएल लेवल ४० मि.ग्रॅ./डीएल किंवा त्यापेक्षा अधिक होणे गरजेचे आहे.
२० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील स्त्रियांची कोलेस्ट्रॉल पातळी
२० वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात टोटल कोलेस्ट्रॉल १२५ – २०० मि. ग्रॅ./ डीएलमध्ये असले पाहिजे. याशिवाय नॉन- एचडीएल लेवल १३० मि.ग्रॅ./डीएल पेक्षा कमी आणि एलडीएल लेवल १०० मि.ग्रॅ./ डीएल पेक्षा कमी असले पाहिजे. तर एचडीएल मि.ग्रॅ./डीएल किंवा त्यापेक्षा अधिक असले पाहिजे.
हेही वाचा: Covid updates: सावधान ! आता मास्क बाहेर काढा रे; तो पुन्हा येतोय..!