Last Updated on December 23, 2022 by Jyoti S.
environment news: नाताळानंतर थंडी वाढणार, ‘या’ जिल्ह्यांतील सरासरी तापमान घसरणार
राज्यातील तापमान अजूनही डिसेंबरच्या सरासरीइतके खाली उतरलेले(environment news) नाही. मात्र, आजपासून (शुक्रवार) राज्याच्या काही भागांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, ख्रिसमसनंतर थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
नाताळानंतर थंडी वाढणार
डिसेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’ सारख्या उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा थंडी परतू लागली आहे. नाताळानंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.हेही वाचा:Maharashtra: महाराष्ट्रात थंडी परतणार, या दिवसापासून जाणवणार कडाक्याचा गारठा..!!
काश्मीर खोरे, हिमाचलमधील अति थंडी आणि बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंडीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील गार वाऱ्यामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जिल्ह्यात 23 ते 27 डिसेंबर दरम्यान पाच दिवस थंडीची तीव्रता अधिक असेल, उर्वरित महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.