Saturday, February 24

health care: तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान!

Last Updated on December 28, 2022 by Jyoti S.

health care: तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान!

तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किन्सस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिले जाते. ऑक्सीडेटिव तणाव, उच्च रक्तचाप, एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.

घरात एखादे शुभकार्य असो, सण असो किंवा मग असाच एखादा खास दिवस. मेजवानी करण्यासाठीच घरातील अनेकजण आग्रही असतात. साग्रसंगीत जेवण वाढलेले पान पुढ्यात आलेले कोणाला चालणार नाही. साग्रसंगीत म्हणावे तर, या पानात पुरीपासून मीठापर्यंत सर्वच आले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

जेवणाच्या पानात(health care) टम्म फुगलेली पुरी दिसली रे दिसली की ती फस्त करण्यासाठी अनेकांना क्षणांधांचाही विलंब करता येत नाही. तिथे पुरी तळण्यासाठी वापरण्यात आलेले तेल पुन्हा कसे वापरता येईल, याचाच विचार स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात घोंगावत असतो. यावर पर्यायही सुचतो. तेल वाया जाण्याऐवजी दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये भाजी, वरण किंवा आणखी एखाद्या पदार्थासाठी या तेलाचा वापर करण्याला प्राधान्य दिले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का असे करण्याचे थेट परिणाम आरोग्यावर होतात.

जेवणासाठी वापरलेले तेल पुन्हा गरम केल्यास त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रेडिकल्सही बनतात, ज्यामुळे सूज येण्यापासून अनेक जुने आजार ओढवले जाण्याचा धोका असतो, असे म्हणतात. एफएसएसएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकदा वापरलेले तेल पुन्हा गरम करणे टाळावे.हेही वाचा: Health tips plastic bottle :प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताय? त्यामुळे वाढू शकता विकार बघा.

एफएसएसएआय नुसार तळलेल्या(health care) वस्तू वापरल्यानंतर ते तेल फक्त तीन वेळेसच वापरता येऊ शकते. पण, तज्ज्ञांच्या मते शक्यतो ही बाब टाळावी. ऑक्सीडेटिव तनाव, उच्च रक्तचाप, एवेरोस्क्लेरोसिससाठी तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो. त्यामुळे यापुढे तेलाचा वापर जेवणात करताना खूप टाइम विचार करा, स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाची जास्त काळजी घ्या.हेही वाचा: Ration rice: रेशनच्या तांदळामुळे वाढणार तुमच्या शरीरातील लोह कसे ते बघा!

(टीप: सदरात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Comments are closed.