Last Updated on December 22, 2022 by Jyoti S.
Latest update covid-19: लग्न सोहळे, मेळावे पुढे ढकला…!! कोरोनासंदर्भात ‘आयएमए’कडून मार्गदर्शक सूचना जारी…
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने रौद्र रुप धारण केलंय. यूएसए, जपान, फ्रान्स,दक्षिण कोरिया,व ब्राझील यांसारख्या प्रमुख देशांमध्ये गेल्या 24 तासांत जवळपास 5.37 लाख नवीन प्रकरणे ही नोंदवली गेली. भारतात 145 नवे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी चार रुग्ण हे आता कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची BF.7 ची आहेत.
भारतातील सध्याची परिस्थिती चिंताजनक नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र उपचारापेक्षा काळजी घेणे चांगले असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात ‘आयएमए’ने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविडला रोखण्यासाठी नेमकी नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत माहिती सांगितली आहे.
हेही वाचा: Covid-19 update : कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र टास्क फोर्स स्थापन करणार आहे
‘आयएमए’च्या मार्गदर्शक सूचना(Latest update covid-19)
प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे
साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरण्यास सुरुवात करा.
सोशल डिस्टन्स पाळावा
लग्न समारंभ, सार्वजनिक मेळावे पुढे ढकलण्यात यावेत
शक्यतो आंतरराष्ट्रीय प्रवास करणे टाळा.
आपत्कालीन औषधे, ऑक्सिजन पुरवठा व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित मंत्रालये आणि विभागांना आवश्यक ती उपकरणे जारी करून त्यांनी तयारी वाढविण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र सरकारला केलेले आहे.
सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील मजबूत पायाभूत सुविधा, व समर्पित वैद्यकीय मनुष्यबळ, सरकारकडून सक्रिय नेतृत्व समर्थन आणि पुरेशी औषधे तसेच लसींची उपलब्धता, या गोष्टींमुळे भारत भूतकाळातील कोणत्याही परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास सक्षम असेल, असे सांगण्यात आले आहे.