Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.
Lockdown update : लॉकडाऊनची वेळ येणार नाही ‘आयएमए’चे डॉ. गोयल यांचा देशवासीयांना दिलासाभारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चिनी नागरिकांपेक्षा उत्तम
भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चिनी नागरिकांपेक्षा उत्तम आहे; शिवाय भारतात जवळपास ९५ टक्के लसीकरण झालेले असल्याने भारतात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ येणार नाही, असा दिलासा इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल गोयल दिला आहे.

एका मुलाखतीत डॉ. गोयल(Lockdown update) म्हणाले की, भारतात गुरुवारी १८५ कोरोना रुग्ण आढळले आहेत . आदल्या दिवशीपेक्षा फक्त सहाच रुग्णांची वाढ झाली. चीनमध्ये ज्या झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे, तशी स्थिती अजून तरी भारतात नाही. त्याला कारण म्हणजे भारतात जवळजवळ ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले . शिवाय भारतीय नागरिकांची रोग प्रतिकारक शक्तीही चिनी नागरिकांपेक्षा जास्त चांगली आहे. त्यामुळे भारतात लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ येणार कधीच येणार नाही. पण काळजी घेण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती, शारीरिक अंतर ठेवण्याची सक्ती आदी निर्बंध पाळने खूप गरजेचे आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता भारताने पुन्हा एकदा मूलभूत पद्धतच स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे टेस्टिंग, ट्रेसिंग आणि उपचार ही त्रिसूत्री असल्याचे गोयल यांनी म्हणाले.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.
नाकावाटे लशीची आजपासून नोंदणी सुरु
नाकावाटे देण्यात येणाऱ्या लशीची नोंदणी(Lockdown update) शनिवार (दि. २४) पासून करता येणार आहे. कोविन अॅपवर ही नोंदणी करता येईल. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. केंद्र सरकारने भारत बायोटेकने विकसित केलेल्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयामध्ये आता सध्या बूस्टर डोस म्हणून ही लस घेता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.हेही वाचा: Ration: रेशन ‘या’ महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..