Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.
Nashik covid updates: उपाययोजना थकल्या प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही दुर्लक्ष
नाशिक(Nashik covid updates): कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीतीने देशाला धडकी भरली असल्याने पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. लसीकरण हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय असतानाही गेल्या दोन वर्षांपासून दहा टक्के नाशिककर अजूनही लस घेत नसल्याने अशा नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
देशात कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधात्मक लस आली आणि देशभर लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात आला. जानेवारी २०२० पासून देशातील प्रत्येक नागरिकाने प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी यासाठी देशव्यापी मोहीम सुरू झाली. संपूर्ण आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाची केंद्रे उघडण्यात आली. जिल्ह्यातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी जिल्हाप्रशासनाच्या नियंत्रणाखाली लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन करण्यात आलं .
त्यानुसार सुरू झालेली मोहीम डिसेंबर २०२२ मध्येही सुरूच आहे. आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या नाशिककरांची टक्केवारी ८९.७८ टक्के इतकी आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७९.७१ टक्के इतकी आहे. याचाच अर्थ अजूनही १० टक्के नाशिककरांनी पहिला डोसदेखील घेतलेला नाही, तर २० टक्के नागरिकांचा दुसरा डोस झालेला नाही. त्यामुळे प्रिकॉशन डोस घेणाऱ्यांची टक्केवारीदेखील कमीच आहे. हि टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे.हेही वाच: Todays Gold Rates : नाशिकमधील सोन्याचे आजचे दर
(Nashik covid updates)लसीकरण पुन्हा सुरु; कोविशिल्ड उपलब्ध नाही
कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली असून, तूर्तास लसीकरणावर पुन्हा भर दिला जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, सध्या केवळ कोव्हॅक्सिनची लसच उपलब्ध आहे. कोविशिल्डचा तुटवडा असल्याने संपूर्ण राज्यात कोविशिल्डचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही(Nashik covid updates) ही लस सध्या मिळत नाही. मात्र, ज्यांना प्रिकॉशन डोस घ्यावयचा आहे, त्यांनी कोव्हॅक्सिन घेतला तरी चालणार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
टक्केवारी वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने ‘हर घर दस्तक’ उपक्रम राबविला. देवस्थानच्या ठिकाणी लसीकरण कॅम्प घेतले गेले, मात्र तरीही पहिला डोसची टक्केवारीची गती वाढू शकलेली नाही.
९० टक्के ही समाधानकारक आकडेवारी असली तरी लसीच्या संर- क्षणापासून १० टक्के नागरिक अजूनही दूर असल्याने त्यांना या कक्षेत आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.