तेल : रिफाईंड ऑइल आपल्याला हानिकारक आहे, मग कुठलं तेल खाण्यात वापरायचे आणि तेच का खायचं हे आपण जाणून घेऊया ?

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

कोल्ड कम्प्रेस् ऑइल म्हणजेच लाकडी घाण्याचे तेल. जुन्या पद्धतीत तेल काढण्याची पद्धत म्हणजे लाकडी घान्यावरील तेल.

लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे काय !

  • लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे ते नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .
  • शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात.तो सुगंध त्याच प्रोटिन्सचा असतो.
  • शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये शारीरिक जखम दिसून येते पण मानसिक जखम अजिबात दिसत नाही.आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स देखील असतात .
  • लाकडी घाण्यावरचे तेल गुणकारी असते कारण हे तेल काढताना लाकडी तेल घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्तीचा दाब दिला जात नाही .तसेच हा घाणा एक मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM 14 असते . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना त्यात एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .
  • शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळेच तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल कायम आवश्यक असावे .
  • शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार माणसाला होत नाही .
  • हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस,ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल खूपच गुणकारी आहे.
  • भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते त्यांना कुठल्याच प्रकारचा आजार नव्हता . 100 वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.