Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.
Sinner malegaon devla oxygen plant: कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क
मालेगाव कोरोना लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील सामान्य ग्णालयाने तयारी पूर्ण केली आहे. येत्या मंगळवारी (दि.२७) रोजी रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. उपलब्ध उपकरणांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दोनशे खाटांना ऑक्सिजनची पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. लहान मुलांचा वॉर्डही सुरू केला जाणार असल्याची माहिती सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवला होता. या पार्श्वभूमीवर खास मालेगावसाठी (Sinner malegaon devla oxygen plant)२० हजार लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंजूर करुन घेण्यात आला होता. सध्या दोनशे खाटा ऑक्सिजन लाईनने जोडल्या आहेत. संभाव्य लाट आलीच तर ऑक्सिजन बेडची गरज भासू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गंभीर परिस्थिती ओढवल्यास सामान्य रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सामान्य रुग्णालयात पुरेशा ऑक्सिजन साठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा:Nashik covid updates: दहा टक्के नाशिककर अजूनही पहिला डोस घेईना!
सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील दोन ऑक्सिजन प्लांट सज्ज
Sinner malegaon devla oxygen plant
सिन्नर (sinner): येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन ऑक्सिजन प्लॅट व १०० बेडची व्यवस्था सुस्थितीत असल्याने संभाव्य लाटेच्या काळात याठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
कोरोना काळात सिन्नरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा कधीच जाणवला नाही, याउलट शहर व जिल्ह्यालादेखील सिन्नरमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता.
देवळा (Devla): तालुक्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण रुग्णालय देवळा व उमराणे येथे ऑक्सिजन जनरेशन प्लँट सुरू करण्यात आले आहेत. तालुक्याची ऑक्सिजनची गरज त्यातून भागू शकेल.
कोरोना लाटेत ज्या त्रुटींमुळे आरोग्य विभागापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या मोठ्या प्रमाणात दूर करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात झालेले नुकसान भरून काढण्याच्या कामाला लागलेले असतानाच पुन्हा कोरोना येण्याची भीती निर्माण झाल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. देवळा ग्रामीण रुग्णालयात २० एनएम क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लॅट बसविण्यात आला आहे. दररोज ६० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची या प्लँटची क्षमता आहे. प्लॅटमध्ये काही बिघाड झाला तर ४० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. देवळा व उमराणा ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ४० अशी ८० बेडची सुविधा तालुक्यासाठी उपलब्ध आहे.हेही वाचा:Lockdown update : लॉकडाऊनची वेळ येणार नाही!!त्यासाठी नाकावाटे लशीची आजपासून नोंदणी सुरु, डॉ. गोयल.
देवळा येथील ऑक्सिजन प्लॅट पूर्ण क्षमतेने भरून ठेवला तर त्यातील ऑक्सिजन १५ दिवस पुरेल. दहा बेडच्या आयसीयू विभागाचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण होईल. यामुळे तालुक्यातील अत्यवस्थ रुग्णांना यापुढे नाशिक किंवा मालेगाव येथे उपचारासाठी घेऊन जावे लागणार नाही. त्यांच्यावर येथेच उपचार करता येतील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. कोरोनाची रॅपिड रॅट टेस्टींगची सुविधा ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे. – डॉ. गणेश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, देवळा ग्रामीण रुग्णालय