Monday, February 26

Eclips news 2023 : या वर्षीच्या सूर्य आणि चंद्रग्रहणाचा तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडेल, जाणून घ्या सविस्तर

Last Updated on April 3, 2023 by Jyoti S.

Eclips news 2023

या वर्षातील पहिलेच सूर्यग्रहण हे चैत्र अमावस्येला २० एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे असणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या वर्षातील(Eclips news 2023) पहिलेच सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक खूप महत्त्वाचे आहे. या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य मेष राशीत असेल. या ग्रहणानंतर फक्त दोन दिवसांनी गुरू हा मेष राशीमध्ये प्रवेश करेल आणि सूर्याशी त्याचा संयोग होईल.तसेच या वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसे होणार आहे? त्याचा परिणाम काय होईल? वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याबद्दल ज्योतिषशास्त्राचे काय म्हणणे आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

या वर्षीचे ग्रहण आणि त्यांचे परिणाम जाणून घ्या

वर्षातील पहिले ग्रहण:

पंचांगनुसार हे सूर्यग्रहण(Eclips news 2023) सकाळी ७.०४ ते दुपारी १२.२९ पर्यंतच असेल. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध नाही. हे ग्रहण दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये या देशांमध्ये दिसणार आहे.

वर्षातील दुसरे ग्रहण:

वर्षातील आताचे हे दुसरे आणि पहिलेच चंद्रग्रहण ५ मे रोजी होणार आहेच .पेनम्ब्रल येथे हे चंद्रग्रहण होणार आहे, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध नाही आणि ते भारतीयांना ते अजिबात दिसणार नाही. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांमध्ये दिसून येते. ते भारतीय वेळेनुसार रात्री ८:४५ ते १:०० पर्यंत असेल.

2023 वर्षातील तिसरे ग्रहण:

वर्षातील तिसरे ग्रहण सूर्यग्रहण(Eclips news 2023) असेल, जे 14 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे जे भारतीय पाहू शकत नाही. त्यामुळे सुतक काळही वैध ठरत नाही. टेक्सास, मेक्सिको, मध्य अमेरिका, कोलंबिया, ब्राझीलचा काही भाग, अलास्का आणि अर्जेंटिना येथे हे ग्रहण दिसणार आहे.

वर्षातील शेवटचे ग्रहण:

तसेच या वर्षातील चौथे आणि शेवटचे ग्रहण 28 ऑक्टोबर रोजी दिसणार असून ते तिथले चंद्रग्रहण असेल. शरद पौर्णिमेच्या दिवशी हे ग्रहण फक्त भारताच्या काही भागातच दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असणार आहे.

हेही वाचा: Petrol disel LPG rates : आजचे पेट्रोल,डिझेल आणि LPG चे दर पहा

हे आंशिक चंद्रग्रहण आहे आणि भारताव्यतिरिक्त युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण आफ्रिका, आर्क्टिक, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागर यासह आशियातील अनेक देशांमधून दृश्यमान होईल.

नैसर्गिक आपत्ती होईल

या वर्षी होणार्‍या 4 ग्रहणांचा सर्व राशीच्या लोकांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार आहे. काही लोकांसाठी हे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण शुभ तर काहींसाठी अशुभ असेल. दुसरीकडे या ग्रहणांचा देश आणि जगावर काय परिणाम होतो याविषयी बोलायचे झाले तर ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्याकडून नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता आहे. या ग्रहणांमुळे भूकंप, पूर, सुनामी येऊ शकतात. एवढेच नाही तर त्यामुळे विमान अपघात, राजकीय अस्थिरता निर्माण होईल. व्यवसायात तेजी येईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

हेही वाचा: LPG Gas Cylinder New Rules :आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना मोठा दिलासा आता LPG गॅस सिलिंडरच्या दरामध्ये झाली मोठी कपात, जाणून घ्या आजचे नवे दर