Tuesday, February 27

IPL 2023 : पाच कर्णधारांना शिक्षा होणार…केएल राहुलसह हार्दिक पांड्यावर बंदी घालणार

Last Updated on April 21, 2023 by Jyoti S.

IPL 2023

IPL 2023: आयपीएलमधील पाच कर्णधारांवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. स्लो ओव्हर रेटसाठी पाचही कर्णधारांना यापूर्वीच दंड ठोठावण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


Nashik : आयपीएल 2023 चा मोसम धमाकेदार सुरु आहे. क्रिकेटप्रेमीही क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे अर्धा डझन कर्णधारांवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आणखी दोन चुका झाल्यास या कर्णधारांवर बंदी येऊ शकते. हार्दिक पांड्या, फाफ डु प्लेसिस, संजू सॅमसन, केएल राहुल आदी कर्णधारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कर्णधारांचे संघ आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत या कर्णधारांवर बंदी घातल्यास या संघाला मोठा धक्का बसू शकतो.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, मुंबई इंडियन्सच्या सामन्यात रोहित शर्माच्या जागी आलेला सूर्यकुमार यादव आणि स्लो ओव्हर रेटसाठी लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांना १२ रुपये दंड लाख लावण्यात आले आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे या कर्णधारांवर केवळ 12 लाखांचा दंडच ठोठावण्यात आला नाही तर कडक इशाराही देण्यात आला आहे. या चुकीनंतर संघाने एकच चूक दोनदा केली तर थेट कर्णधारावर बंदी घातली जाईल. अशा स्थितीत या पाच कर्णधारांना सतर्क राहावे लागेल. सर्व संघांनी पहिली चूक केली. त्यामुळे कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला.

नियम काय म्हणतो?


निर्धारित वेळेत षटके टाकली नाही म्हणून कर्णधारांना दंड ठोठावण्यात आला आहे. जर संघाने तीच चूक पुन्हा केली तर संपूर्ण संघाला दंड ठोठावला जाईल आणि कर्णधाराला 24 लाखांचा दंड आकारला जाईल. इतर खेळाडूंना मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.

हेही वाचा: Phonepe offer : अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने उत्तम ऑफर! PhonePe वरून सोने खरेदी करा; होईल मोठा फायदा

तिसऱ्यांदा असे केल्यास कर्णधाराला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी लागू शकते. तर प्लेइंग इलेव्हनमधील इतर 10 खेळाडूंना त्यांच्या मानधनाच्या 50 टक्के दंड आकारला जाईल. त्यामुळे आगामी आयपीएल सामन्यांमध्ये या संघांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

राहुलला दंड


राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर केएल राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊचा कर्णधार हा केएल राहुलला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे.राजस्थान रॉयल्सविरुद्ध लखनौच्या संघाने त्यांनी वेळेवर षटके टाकली नाहीत. त्यामुळे कॅप्टन राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे.

यामुळे आगामी प्रत्येक सामन्यात राहुलला ओव्हर रेटकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ही चूक दुसऱ्यांदा झाली तर त्याची शिक्षा केवळ कर्णधारालाच नाही तर संपूर्ण संघाला भोगावी लागेल. मात्र, तिसऱ्यांदा नियमानुसार कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mobile storage : फोनची स्टोरेज वारंवार फुल होतेय?, एका झटक्यात समस्या सोडवा, पाहा Tips and Tricks

Comments are closed.