Monday, February 26

Jobs automotive sector : दोन वर्षांत वाहन क्षेत्र देणार नोकऱ्या,नितीन गडकरींची माहिती!!

Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.

Jobs automotive sector : दोन वर्षांत वाहन क्षेत्र देणार नोकऱ्या आणि पैसा १५ लाख कोटींपर्यंत करणार वाढ, नितीन गडकरींची माहिती!!

कोलकाता (Jobs automotive sector): भारतीय वाबहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावणारहन उद्योग वस्था आव्हानांचा मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. ड. वित्तीय बाजारांत वर्ष २०२४च्या अखेरपर्यंत या क्षेत्राची उलाढाल दुपटीने वाढवून सुमारे १५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी(nitin gadkari) यांनी दिली. हे लक्ष्य साधल्यास भारत या क्षेत्रात जगातील टॉप देशांमध्ये सामील होईल, असे गडकरी म्हणाले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कोलकाता येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की आमचे मंत्रालय पुढील वर्षी ५ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर(Jobs automotive sector) करणार आहे. त्यापैकी दोन लाख कोटी रुपये सरकारतर्फे तर उर्वरित रक्कम बाजारातून उभारण्यात येईल. बांधकामाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला जात आहे. रिसायकल करता येणाऱ्या मालाचा वापर वाढविण्यावर भर असेल, असे गडकरी म्हणाले.

बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावणार

हेही वाचा: MPSC updates: एमपीएससीकडून मोठी अपडेट, ‘या’ मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी..

सध्या भारताचे वाहन उद्योग क्षेत्र ७.५ लाख कोटी रुपयांचे आहे. ते दुपटीने वाढविण्याचे लक्ष्य आहे. त्यातून देशात रोजगाराच्या(Jobs automotive sector) संधी वाढतील.

■ तसेच २०३० पर्यंत देशातील बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावतील. बायो-इथेनॉल, बायो- सीएनजी, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजन यासारखे स्वच्छ हरित इंधन विकसित करण्यात येत आहे.

08% परतावा लहान गुंतवणूकदारांना

आमच्या मंत्रालयातील योजनांमध्ये लहान गुंतवणूकदारांना ८% परतावा मिळाला आहे. हा बँकापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हांला फंडिंगची अडचण नाही, असे गडकरींनी सांगितले.