Last Updated on January 13, 2023 by Jyoti S.
Mahanagarpalika jobs: मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रशासनाची तयारी सुरू
Table of Contents
नाशिक(Nashik) : गेल्या सात ते आठ वर्षांपासून भरतीसाठी पाठपुरावा करणाऱ्या महापालिकेला सत्तांतर पावल्याचे दिसत आहेत. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमधील ४० हजार पदांची भरती लवकरच करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेत.
त्यामुळे नाशिक महापालिकेतदेखील मेगा भरतीचे वारे वाहू लागले आहे. शासनाने अनुकूलता दिसल्यास किमान दोन हजार पदांची महाभरती होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यातील महापालिका(Mahanagarpalika jobs) आयुक्त आणि नगरपालिकांचे अधिकारी यांची बैठक बुधवारी (दि. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. यावेळी राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्या आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार(Dr. Chandrakant Pulkundwar) या बैठकीस उपस्थित होते. त्यामुळे आता नाशिक महापालिकेत भरतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
नाशिक महापालिकेचे आकृतीबंध गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे पडून आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis)आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानादेखील हा. आकृतीबंध मंजूर करण्यासाठी प्रयत्न करून उपयोग झाला नाही.
आकृतीबंधानुसार महापालिकेत सुमारे पथ्यावर पडली आहे. सात हजार जागा आहेत. त्यात सध्या साडे चार हजार अधिकारी कर्मचारी आहेत. मात्र, दर महिन्याला अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्याचप्रमाणे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने कामकाजावर ताण पडत आहे.
त्यामुळे संपूर्ण आकृतीबंध मंजूर होत नसेल तर किमान वैद्यकीय- आरोग्य, अग्निशमन दल आणि अभियांत्रिकीच्या जागा तरी भरण्यास परवानगी द्या, अशी वारंवार मागणी झाली आहे. मात्र, त्याचा उपयोग आहेत. झाला नाही. कोरोना काळातील संकटात राज्यात नाशिकसह सर्वच महापालिकांमधील अपुरे मनुष्यबळ लक्षात आले होते.
नाशिक महापालिकेला(nashik mahapalika) गेल्यावर्षी मोठ्या मुश्किलीने अग्निशमन आणि वैद्यकीय विभागातील एकूण ७०६ पदे भरण्यास, मान्यता दिली होती. अन्य विभागातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा महापालिकेच्या पथ्यावर पडली आहे.
मनपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्त जागांपैकी किमान दोन हजार पदे तरी तातडीची(Mahanagarpalika jobs) बाब म्हणून भरली जाऊ शकतात. तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे.
शासनाकडून अद्याप प्रस्ताव पाठवण्याचे आदेश आलेले नाहीत. मात्र, ते येताच सेवा प्रवेश नियमावली मंजूर करण्यासाठी तसा प्रस्ताव पाठवला जाऊ शकतो.
हेही वाचा: GAIL India Limited jobs : 50 हजार रुपयांपासून पगार सुरू होतो, 277 रिक्त पदांसाठी भरती
महापालिकेत वैद्यकीय- आरोग्य, अभियांत्रिकी, अग्निशमन दलात सर्वाधिक रिक्त पदे.
सफाई कामगारांची सर्वाधिक रिक्त पदे, मात्र ती प्रत्यक्ष भरणार की आऊट-सोर्सिंग(Outsourcing) करणार हे महत्त्वाचे.