Saturday, February 24

Police bharti updates : पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार उमेदवार मैदानात

Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.

Police bharti updates : पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार उमेदवार मैदानात

२ जानेवारीपासून प्रारंभ : तीन तृतीयपंथींनाही खाकीची ओढ

नाशिक : ग्रामीण पोलिस(Police bharti updates) दलात पोलिस शिपाई पदाच्या १७९ जागांसाठी तब्बल २१ हजार ४९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यानुसार येत्या २ जानेवारीपासून शिपाई, चालक पदाच्या रिक्त जागांसाठी आलेल्या अर्जानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ४ जानेवारीपर्यंत चालकपदाच्या उमेदवारांची चाचणी पूर्ण होणार असून, त्यानंतर २६ जानेवारीपर्यंत पोलिस शिपाईपदाच्या उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

बहुप्रतीक्षित पोलिस(Police bharti updates) शिपाई भरतीची ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया हि आता पूर्ण होण्यास आली आहे. १५ डिसेंबर ही सर्वांसाठी शेवटची वाढीव मुदत सरकारकडून देण्यात आलेली होती. यानंतर ‘स्लॉट’ तयार करण्यात आले नववर्षात मैदानी चाचणीचा श्रीगणेशा होणार आहे. यामुळेच आता भावी पोलिसांचा मैदानात कस लागणार आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात आता एकूण १६४ पोलिस शिपाई आणि १५ शिपाई चालकांची पदे भरली जाणार आहेत असे स्पष्ट सांगण्यात आले आहे . यानुसार येत्या सोमवारपासून (दि. २) चालकांच्या उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी दोन दिवसांत आटोपण्याचा ग्रामीण पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.

यानंतर २६ जानेवारीपर्यंत पोलिस शिपाईपदाच्या १६४ रिक्त जागांसाठी नशीब अजमावणाऱ्या तब्बल २१ हजार ४९ उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उमाप यांनी सांगितले.हेही वाच: Police Recruitment : भावी पोलिसांनो, मैदानात कस लावण्यासाठी व्हा सज्ज!

आडगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर तसेच भुजबळ नॉलेज सिटीच्या १६०० मीटरच्या ट्रॅकचाही वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ ७१ महिला उमेदवारांचे अर्ज

पोलिस शिपाई पदभरतीमध्ये महिला आरक्षणानुसार शिपायांसाठी ५१ तर ‘चालकपदासाठी ५ जागा भरावयाच्या आहेत. यासाठी एकूण ७९ अर्ज ग्रामीण पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत. पुरुषांच्या तुलनेत पोलिस भरतीत नशीब आजमावणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते.

Comments are closed.