Police Recruitment : भावी पोलिसांनो, मैदानात कस लावण्यासाठी व्हा सज्ज!

Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.

Police Recruitment: ‘स्लॉट’च्या तयारीस प्रारंभ नववर्षात मैदानी चाचणीचा श्रीगणेशा

बहुप्रतीक्षित पोलिस(Police Recruitment) शिपाई भरतीची ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. १५ डिसेंबर ही शेवटची वाढीव मुदत सरकारकडून देण्यात आली होती. यानंतर ‘स्लॉट तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. नववर्षात मैदानी चाचणीचा श्रीगणेशा होणार आहे. यामुळे भावी पोलिसांचा आता मैदानात कस लागणार आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलात एकूण १६४ पोलिस शिपाई व १५ शिपाई चालकांची पदे भरली जाणार आहेत.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य मनुष्यबळाची कमतरता काढण्यासाठी मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त असलेल्या पदांवर पोलिस भरती राबविली जात आहे. सुमारे १४ हजारांपेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १७९ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, शेकडो अर्ज झाले आहेत. अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावर स्लॉट’ तयार करण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय विभागाकडून देण्यात आल्या आहेत. येत्या २ जानेवारीपासून मैदानी चाचणीचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.हेही वाचा: Talathi recruitment: राज्यात तलाठी भरतीची प्रक्रिया सुरु..!! जिल्हानिहाय रिक्त जागा जाहीर..

नाशिक ग्रामीण पोलिस(Police Recruitment) दलात २०१९ सालानंतर यावर्षी पोलिस भरती होत आहे. यामुळे मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासंदर्भातील आकडेवारी अद्याप ग्रामीण अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. तरी वेळापत्रकातून. त्यासंदर्भातील माहिती पुढे स्पष्ट होणार आहे. कोरोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्णसहित उच्च शिक्षितांचे पोलिस भरतीकडे लक्ष लागले होते.हेही वाचा: Zp Naukari : जम्बो भरती होणार ७७४ पदांसाठी

ग्रामीण पोलिसांची भरती अशी……

Comments are closed.