Last Updated on December 18, 2022 by Taluka Post
State Police: राज्य पोलीस भरतीची मैदानी चाचणी ची तारीख ठरली ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
State Police: राज्य पोलीस भरतीची मैदानी चाचणी ची तारीख ठरली आधी चालक पदासाठी, त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी होणार.उमेदवारांच्या मोबाईलवर वेळापत्रक पाठवले जाणार.
राज्य पोलीस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून सुरु होणार. एका दिवशी १ हजार उमेदवारांची होणार मैदानी चाचणी.पोलीस भरतीसाठी तृतीय पंथीयांना संधी देण्यात आलीये. १८ हजार जागांसाठी २० लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे.
मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी चाचणी घेतली जणार आहे. उमेदवारांनी जेथे मैदानी चाचणी दिली असेल, तेथेच लेखी परीक्षाही द्यावी लागणार आहे.
सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. त्यातून एका जागेसाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी व लेखी परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीची नजर असेल, शिवाय व्हिडिओ शुटिंगही केले जाणार आहे.
हेही वाचा: Job: रेल्वेत 2422 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..