To retired jawans: निवृत्त जवानांना नववर्षाची भेट, ‘वन रँक-वन पेन्शन’ योजनेतील सुधारणेस सरकारची मंजुरी..

Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.

To retired jawans: निवृत्त जवानांना नववर्षाची भेट, ‘वन रँक-वन पेन्शन’ योजनेतील सुधारणेस सरकारची मंजुरी..

भारतीय लष्करासाठीच्या ‘वन रँक-वन पेन्शन’ योजनेत सुधारणा करण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली. हा निर्णय(To retired jawans) पूर्वलक्ष्यी प्रभावाने, 1 जुलै 2019 पासून लागू होणार असून, त्याचा लाभ सुमारे 25 लाख निवृत्त सैनिकांना होणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

काय फायदा होणार..?

▪️ जुलै 2019 ते जून 2022 या काळातील थकबाकीपोटी निवृत्ती वेतनधारकांना 23,638 कोटी रुपये मिळतील. त्यामुळे सरकारी तिजोरीवर 8,450 कोटींचा अतिरिक्त वार्षिक बोजा पडेल.

▪️ शहिद जवानांच्या पत्नी, तसेच दिव्यांग निवृत्तीवेतनधारकांसह कौटुंबीक निवृत्ती वेतनधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळेल. ही थकबाकी चार सहामाही हप्त्यांमध्ये दिली जाईल.

▪️ 2018 मध्ये निवृत्त झालेल्या जवानांच्या किमान व कमाल पेन्शनच्या सरासरीच्या आधारे त्याच श्रेणी व सेवा कालावधीसह आधीच्या जवानांना लाभ मिळेल.

हेही वाच: Ration: रेशन ‘या’ महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..

▪️ 30 जून 2019 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना या निर्णयाचा लाभ मिळेल, परंतु 1 जुलै 2014 पासून मुदतपूर्व निवृत्त झालेल्या जवानांना यातून वगळण्यात आले आहे.